ETV Bharat / state

Pistol Smugglers Hub Buldana: बुलडाण्यात सातपुड्याच्या पायथ्याशी आढळला अवैध पिस्टल माफियांचा हब

author img

By

Published : Jun 9, 2023, 5:52 PM IST

Pistol Smugglers Hub Buldana
अवैध पिस्टल माफियांचा हब

बुलडाण्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी अवैध पिस्टल माफियांचा हब तयार होतो आहे. ठाणे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पोलिसांनी ठाण्यातील राबोडी पोलीस ठाणे अंतर्गत दोन जणांना 3 पिस्टल, 6 मॅक्झिन आणि 4 जिवंत काडतुसांसह अटक केली होती. अधिक तपासात ठाणे गुन्हे शाखेकडून बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस ठाणे हद्दीतील टूनकी गावातून एका महिलेच्या घरातून तब्बल 14 पिस्टल, 25 मॅक्झिन आणि 8 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अवैध पिस्टल माफियांच्या हबविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी

बुलडाणा : जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या याच भागातून अनेकदा देशी पिस्टलची तस्करी झाली असल्याच्या अनेक घटना याआधीसुद्धा घडल्या आहेत. त्यामुळे आता मुंबई माफियांना शस्त्र पुरवठा करण्यासाठी येथे असलेली काही गावे अवैध पिस्टल माफियांचे हब बनत चाललीत की काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. ठाणे पोलिसांनी बुलडाण्यात येऊन ही कारवाई केल्याने बुलडाणा पोलिसांची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत.



हत्यारांची तस्करी करणारे अटकेत : ठाणे पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यात येऊन ही कारवाई केल्याने जिल्हा पोलीस यंत्रणेवर एक ना अनेक प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. यामध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातून ठाणे शहरातील राबोडी पोलीस ठाणे हद्दीत रमेश मीसीरिया किराडे (25 वर्षे) व मुन्ना माशा अलवे (34 वर्षे दोघेही रा. पाचोरी तालुका) अग्निशस्त्र हत्यारांच्या तस्करीसाठी गेले होते. या दोन्ही आरोपींना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या गुन्हे शोध पथकाने 1 जून रोजी ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडून 3 देशी बनावटीचे पिस्तूल, सहा मॅक्सीन व 6 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी विक्रीसाठी आणलेले 14 देशी पिस्टल, २५ मॅक्झिन, ८ जिवंत काडतूस नातेवाईकांकडे लपवून ठेवल्याची कबुली देखील दिली. सोनाला पोलीस ठाणे कर्मचारी यावेळी देखील हजर होते.

झारखंड एटीएसची कारवाई : अटकेत असलेले आरोपी मध्य प्रदेश येथील असून तेथील पाचोरी हे गाव अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे. आरोपीस 10 जून पर्यंत 'पीसीआर' मिळाला आहे. पाचोरी मध्य प्रदेशचा हा एक डोंगर भाग दऱ्याखोऱ्यांचा दुर्गम भाग आहे. मागील दीड वर्षांपूर्वी झारखंड एटीएसने टोलकी येथे कारवाई करत 14 पिस्टल, १६० जिवंत काडतूस जप्त केले होते. त्यापासून सातपुडा सतत चर्चेत आहे.

हेही वाचा:

  1. Kolhapur robbery: कोल्हापुरातील कत्यायनी ज्वेलर्सवर भरदिवसा सशस्त्र दरोडा; दरोडेखोरांचा गोळीबार, 2 कोटींचे सोने लंपास
  2. Raut Death Threat Call: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी
  3. Solapur Crime News: सोलापूरमध्ये लव जिहादचा संशयावरून महाविद्यालयीन तरुणाला मारहाण; एका संशयितास अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.