ETV Bharat / state

आम्ही जनतेचे सेवक, देवेंद्र फडणवीस यांचे भंडाऱ्यात प्रतिपादन

author img

By

Published : Oct 3, 2022, 8:07 PM IST

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री ( Guardian Minister of Bhandara District ) झालेले देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांचे आज भंडारा येथे पहिल्यांदाच आगमन झाले.

भंडारा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, नव्यानेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री ( Guardian Minister of Bhandara District ) झालेले देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांचे आज भंडारा येथे पहिल्यांदाच आगमन झाले. भंडारा गोंदियाचे खासदार, माझी नगराध्यक्ष यांच्या कामाच्या अहवाल पुस्तकेचा विमोचन सोहळा लक्ष्मी सभागृह ( Lakshmi Hall Bhandara ) येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. आम्ही जनतेचे सेवक असल्याने आमच्या कामाचा लेखाजोखा आम्ही जनतेसमोर प्रत्येक वेळेस मांडावा, त्या निमित्ताने हा विमोचन सोहळा अतिशय महत्त्वाचा होता, असं देवेंद्र फडणीस ( Devendra Fadnavis ) यांनी सांगितलं. तर भंडारा जिल्ह्यात झालेल्या धान घोटाळ्यातील घोटल्याबाज लोकांवर कार्यवाही करून यानंतर धान खरेदी अधिक पारदर्शी करू, शेतकऱ्यांना लवकरच बोनस दिला जाईल असे त्यांनी सांगितले.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis

लोकप्रतिनिधी जनतेचा सेवक - लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो. मालक जनतेला कामाचा लेखाजोखा देणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधींचे काम आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या कार्य पुस्तिकेचे प्रकाशन म्हणजे मतदारांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भंडारा, गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या नगराध्यक्ष खासदार म्हणून केलेल्या कार्याचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेचे विमोचन राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज भंडारा येथे करण्यात आले.

शेतकऱ्यांना योग्य मोबदला - गोसेखुर्द प्रकल्पाच्या बॅक वॉटर वर जल पर्यटन सुविधा उभारून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करून काम करणार असल्याचे ते म्हणाले. शासकीय आधभुत खरेदी केंद्रावर २ महिन्या पहिले झालेल्या घोटाळ्यातील धानाची चौकशी पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. ज्यांनी यात घोटाळा केला त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करू, शासकीय धन खरेदी केंद्रची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येत आहे असल्याचे ते म्हणाले. येत्या काळात शेतकऱ्यांना योग्य मोबदला किंवा चांगला बोनस मिळावा या दृष्टीने उपाययोजना सुरू असून लवकरच शेतकऱ्यांच्या चांगला मोबदला मिळणार असे त्यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.