ETV Bharat / state

हॉटेलच्या किचनरुममधून दारुची सर्रास विक्री; तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात २ लाख ८० हजारांचे देशी-विदेशी मद्य जप्त

author img

By

Published : Apr 1, 2020, 5:46 PM IST

police-raided-three-places-where-illegal-liquor-was-sold
अवैध दारू विक्री होत असलेल्या तीन ठिकाणांवर छापा, 2 लाख 80 हजरांचा मुद्देमाल जप्त

भंडाऱ्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात २० तारखेपासून दारूबंदी सुरू आहे. मात्र, याचा गौरफायदा घेऊन अवैधरित्या दारु विक्री करण्याचा प्रकार जिल्हाय सुरू होता. यामुळे पोलिसांनी तीन ठिकाणी छापा टाकून २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

भंडारा - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 20 तारखेपासून दारूबंदी सुरू आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीतही अवैधरित्या दारू विक्री करण्याचा प्रकार जिल्ह्यात सुरू होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील तीन विविध ठिकाणी छापेमारी करून दोन लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून 9 लोकांना अटक केली आहे.

अवैध दारू विक्री होत असलेल्या तीन ठिकाणांवर छापा, 2 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार लाखांदूर तालुक्यात छापा मारून अवैधरित्या दारू विक्री करताना तीन लोकांना अटक करून त्यांच्याकडून देशी दारूच्या 2690 बॉटल्स आणि बियरच्या 500 बॉटल असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दुसऱ्या कारवाईमध्ये भंडारा शहरात राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला कंबोज बारवर धाड टाकण्यात आली. या बारचा मालक खुलेआम दारू विक्री करत होता. बारच्या मागच्या भागात असलेल्या किचन रूमच्या दारातून दारूच्या बॉटल्स ग्राहकांना दिल्या जात होत्या. काही बॉटल्स स्कुटीच्या डिकीत ठेवून विक्री केली जात होती. छाप्यादरम्यान देशी, विदेशी दारू, बियर आणि रमच्या बॉटल्स, स्कुटी आणि फ्रिजमध्ये आढळल्या. एकूण 65 हजरांचा माल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाला कार्यवाहीसाठी बोलविण्यात आले. विक्रीच्या नोंदणीत मोठ्या प्रमाणात घोळ आढळल्याने आणि बंदी असताना विक्री कारण्याच्या आरोपावरून या बारला बंद करण्यात आले. पोलिसांनी बार मालक संजू कम्बोज, नोकर प्रविण शुक्ला आणि काशिराम दुपारे यांना ताब्यात घेत संचारबंदी कायदा व दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

तिसऱ्या कारवाईमध्ये गणेशपुरे येथे छापा टाकत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 450 विदेशी दारूच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या. एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.