ETV Bharat / state

Police Suspended: पकडून आणलेल्या अट्टल चोराला पोलिसांनी दिले सोडून.. पाच पोलिसांचे निलंबन

author img

By

Published : Oct 19, 2022, 4:10 PM IST

Police Suspended: भंडारा जिल्ह्याच्या वरठी पोलीस स्टेशनच्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना कामात दिरंगाई करणे (laxity in work ) चांगलेच महागात पडलेले आहे. या पाचही लोकांना पोलीस अधीक्षक यांनी निलंबित केलेले (suspended for laxity in work) आहे. संशयित व्यक्तिला पकडून तो अट्टल चोर असल्याचे कळल्यावरही सोडून दिल्याने या कर्तव्यात कसूरवार म्हणून निलंबनाच्या (Five Police suspended) कारवाईस पुढे जावे लागले आहे.

Police suspension action
Police suspension action

भंडारा : Police Suspended: भंडारा जिल्ह्याच्या वरठी पोलीस स्टेशनच्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना कामात दिरंगाई करणे (laxity in work ) चांगलेच महागात पडलेले आहे. या पाचही लोकांना पोलीस अधीक्षक यांनी निलंबित केलेले (suspended for laxity in work) आहे. संशयित व्यक्तिला पकडून तो अट्टल चोर असल्याचे कळल्यावरही सोडून दिल्याने या कर्तव्यात कसूरवार म्हणून निलंबनाच्या (Five Police suspended) कारवाईस पुढे जावे लागले आहे. यात पोलीस हवालदार राजेश बाभरे, पोलीस हवालदार बाकीराम शेंडे, सहाय्यक फौजदार गंगाधर कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल रेहान पठाण आणि नायक पुलिस कांस्टेबल प्रेमनाथ डोरले यांचा समावेश आहे. (Five employees of Varathi police station suspended) (Latest News from Bhandara)


चोराला रात्री नागरिकांनी पकडले- 13 ऑक्टोबर च्या रात्री 2 वाजे रुपेश गाढवे आणि आशिष मोहतुरे हे दोघे कोजागिरीचा कार्यक्रम उरकून घरी परत जात होते. या दरम्यान त्यांना एका घराची सुरक्षा भिंत ओलांडून एक संशयित व्यक्ति पळताना दिसला. त्याचा पाठलाग करून दोघांनी त्याला पकडले असता त्याच्या जवळ चोरीसाठी उपयोगी येणारी अवजारे सापडली. याची माहिती तत्काल वरठी पोलिसांना दिल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांनी पोलीस दल घटनास्थळी पाठविले आणि त्या संदिग्ध व्यक्तीला पकडून पोलीस स्टेशनला आणले. त्याची माहिती घेतली असता हा अट्टल चोर शेखर गुलाब मेश्राम (रा. सिरसघाट) आहे असे पोलिसांना समजले. (Bhandara Crime)


कारवाही न करता पोलिसांनी सोडले - दुसर्‍या दिवशी 14 ऑक्टोबरला रुपेश आणि आशिष हे दोघे त्याची माहिती घेण्याकरिता वरठी पोलीस स्टेशनला पोहोचले आणि चोराबद्दल विचारपूस केली असता पोलीस कर्मचाऱ्यांकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळू लागली. अधिक माहिती घेतली असता काहीही कारवाई न करता त्या चोराला रात्रीच सोडून दिले असल्याचे समजले. याची तक्रार तत्काळ वरिष्ठ अधिकार्‍यांना करण्यात आली. ज्यात प्राथमिक तपासात पाचही पोलीस कर्मचार्‍यांना कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी या पाचही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.


कामात कसूर तर निलंबन निश्चित - एकच वेळी एकाच पोलीस स्टेशन मधील तब्बल पाच कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून निलंबित केले. शिस्तबद्ध पोलीस अधीक्षक रोहित मतांनी यांनी जिल्ह्यातील इतरही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कामात अजिबात कसूर करता येणार नाही असा संदेश दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.