ETV Bharat / state

Firecrackers Demand Increase : फटाक्यांच्या मागणीत मोठी वाढ, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत फोडले जातात फटाके

author img

By

Published : Jan 2, 2022, 6:54 PM IST

छायाचित्र
छायाचित्र

पूर्वी अक्षता सोहळा पार पडल्यानंतर फोडले जाणारे फटाके आता जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोडल्या जातात. त्यामुळे पूर्वीपेक्षा सध्याच्या घडीला फटाक्यांची मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. फटाके प्रतीसाठी नाही तर देखाव्यासाठी फोडले जातात. फटाके मर्यादित प्रमाणात फोडावे, फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायु प्रदुषण मोठ्या प्रमाणात होतो, असे मत पुजारी यांनी मांडले आहे.

भंडारा - पूर्वी अक्षता सोहळा पार पडल्यानंतर फोडले जाणारे फटाके आता जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणत फोडल्या जातात. त्यामुळे पूर्वीपेक्षा सध्याच्या घडीला फटाक्यांची मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. फटाके प्रतीसाठी नाही तर देखाव्यासाठी फोडले जातात. फटाके मर्यादित प्रमाणात फोडावे, फटाक्यांमुळे ध्वनी प्रदुषण आणि वायु प्रदुषण मोठ्या प्रमाणात होतो, असे मत पुजारी यांनी मांडले आहे.

फटाक्यांच्या मागणीत मोठी वाढ

पूर्वीच्या काळात लग्नच्या वरातीवेळी किंवा स्वागत समारंभावेळी दोन-चार फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला जात होता. त्या काळात फटाक्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत नव्हते. त्यामुळे मर्यादित फटाक्यात लग्नाचा सोहळ्याचा उत्सव साजरा केला जात होता. आता मात्र जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक ठिकाणी फटाके फोडले जातात. सध्या फटाके फोडण्याचे चलन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. एखाद्याच्या घरी बाळ जन्मला म्हणून फटाके फोडले जातात. तर कुठे घरातील एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतरही फटाके फोडत अंत्ययात्रा काढली जाते. एवढेच नाही तर कुठला राजकीय नेता आला तरी फटाके फोडून स्वागत केले जाते. राजकीय विजय किंवा भारतीय संघाने क्रिकेटचा समना जिंकलेला असो तरी फटाके फोडले जातात. एकंदरीतच काय तर प्रत्येक लहान-मोठ्या कारणासाठी फटाके फोडण्याची जणू एक नवीन प्रथाच सुरू झालेली आहे.

विविध पद्धतीचे फटाके बजारात उपलब्ध असल्याने पूर्वीपेक्षा फटाक्याची विक्री वाढलेली आहे. फटाक्यांमुळे प्रदुषण होतो हे मान्यच मात्र उत्साहात फटाके फोडण्याची प्रथा वाढलेली आहे. त्यामुळे एक व्यापारी म्हणून आम्हाला त्याचा आनंद होतो, असे फटाके विक्रेते सांगतात. मागील काही वर्षात मागणीमध्ये वाढ झाल्याने विक्रीही दुप्पट झालेली आहे. मात्र, नेमकी किती प्रमाणत विक्री वाढली याविषयी त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही.

लग्न सोहळ्यामध्ये फटाके फोडणे हे आता नित्याचे झाले आहे. पूर्वी दोन चार फटाके फोडले जात होते. त्या काळात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात झाडे आणि जागाही उपलब्ध होती. मात्र, आता आपल्याकडे झाडांची संख्या कमी झालेली आहे. जागेचे प्रमाणही कमी झाले आहे. अलीकडे फटाके फोडण्याच्या प्रमाणात वाढ होणे हे अतिशय गंभीर आहे. तुम्हाला आनंद झाला म्हणून दोन-चार फटाके नक्कीच फोडा. मात्र, लग्न सोहळ्यासारख्या पवित्र ठिकाणी भरपूर फटाके फोडून ध्वनी आणि वायू प्रदुषण वाढवू नका, असे आवाहन पुजारी मधुकर चेपे यांनी केले.

हे ही वाचा - Bhandara Year Ender 2021 : नवजात शिशु केअर सेंटरला आग, कोरोनाचा हाॅटस्पाॅट; लसीकरणात मात्र तिसरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.