भंडाऱ्यात पावसाचा धुमाकूळ, गोसे धरणाचे 33 दरवाजे उघडले

author img

By

Published : Jul 23, 2021, 6:49 PM IST

गोसे धरण

गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणाचे 33 ही गेट उघडण्यात आले आहे. 30 गेट हे अर्ध्या मीटरने तर 3 गेट 1 मीटरने उघडण्यात आले आहेत. यामधून सध्या 3929.127 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

भंडारा - गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणाचे 33 ही गेट उघडण्यात आले आहे. 30 गेट हे अर्ध्या मीटरने तर 3 गेट 1 मीटरने उघडण्यात आले आहेत. यामधून सध्या 3929.127 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळपासून टप्याटप्याने गेट उघडण्यास सुरुवात झाली होती. दुपारी 3 वाजेपर्यंत 33 ही गेट अर्ध्या मीटरने उघडण्यात येणार होते. मात्र धरणात वाढणाऱ्या पाण्यामुळे दुपारी 1 वाजाता 33 गेट उघडण्यात आले आहेत. या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्राजवळील गावांतील सर्व नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. तर आज 23 जुलै रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

भंडाऱ्यात पावसाचा धुमाकूळ, गोसे धरणाचे 33 दरवाजे उघडले

सकाळपासून टप्प्याटप्प्याने उघडण्यात आले गेट
गोसे धरणाची सध्याची पाणी पातळी 243.17 मीटर एवढी आहे. पाणीसाठा 41.80% आहे. ही पाणीपातळी कायम ठेवण्यासाठी 23 जुलै रोजी सकाळपासूनच टप्याटप्याने गेट उघडण्यास सुरुवात करण्यात आली. सकाळी 10 वाजेपर्यंत 19 गेट उघडण्यात आले होते. तर दुपारी साडेबारा वाजता 31 गेट उघडण्यात आले. यामधून 3390.5 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र धरणात वाढत असलेले पाणी बघताच केवळ 15 मिनिटातच धरणाचे 33 ही दारे उघडण्यात आली. या 33 पैकी 30 दारे ही अर्धा मीटरने तर 3 गेट 1 मीटरने उघडण्यात आले असून यामधून 3929. 127 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच विद्युत गृहातून 160 आणि उजव्या कालव्यातून 24 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होत असून एकूण 4113.127 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी पात्राच्या जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

बुधवारपासून पाऊस परतला
जून महिन्यामध्ये बरसलेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीपासून दडी मारली होती. त्यामुळे शेतकरीही चिंतित झाले होते. कारण पावसामुळे जवळपास 79 टक्के रोवण्या या रखडलेल्या होत्या. मात्र बुधवारपासून पावसाने भंडारा जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली. जिल्ह्यात सातही तालुक्यांमध्ये पाऊस बरसला. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाच्या तुलनेत भंडारा जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात बरसला. मात्र गोसे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी आणि गुरुवारी चांगल्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तसेच नागपूर जिल्ह्यात पावसाच्या दमदार हजेरीने धरणातील पाणी पातळी वाढली आहे.

2020 मधील पुरापासून प्रशासन सज्ज
भंडारा जिल्ह्यात ऑगस्ट 2020 मध्ये महापूर आला होता. हा महापूर मध्यप्रदेशमधील धरणाचे पाणी अचानक सोडल्याने गोसे धरणातील पाणी त्या प्रमाणात सोडता येत नव्हते. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर गोसे धरणातील पाणी सोडल्याने गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर आला होता. मागच्या वर्षी झालेल्या या गोंधळानंतर यावर्षी भंडारा जिल्ह्यातील प्रशासन सज्ज असून ही परिस्थिती टाळण्यासाठी गोसे धरणाची पाणी पातळी कायम ठेवण्यासाठी धरणाचे दारे टप्या टप्प्याने उघडण्यात आली आहेत.

हेही वाचा - Landslide History : आतापर्यंतच्या भूस्खलनाच्या घटना, जवळपास 7000 हून अधिक मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.