ETV Bharat / state

Manjarath road : रस्त्यासाठी नागरिकांचे टॉवरवर सिनेस्टाईल आंदोलन

author img

By

Published : Nov 15, 2022, 2:50 PM IST

Manjarath road
रस्त्यासाठी नागरिकांचे टॉवरवर सिनेस्टाईल आंदोलन

मंजरथ रस्त्यासाठी अनेक दिवसापासून प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा रस्ता होत नसल्याने पँथर सेनेच्या कार्यकत्यांनी टॉवरवर शोले स्टाईल (Sholay style movement on the tower ) आंदोलन सुरु केले आहे. जि प बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष ( Neglect of District Construction ) असल्याने ग्रामस्थ थेट आयडिया टॉवरवर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी (Slogans against the administration at Idea Tower) करत आंदोलन सुरू आहे.

बीड : मंजरथ रस्त्यासाठी अनेक दिवसापासून प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा रस्ता होत नसल्याने पँथर सेनेच्या कार्यकत्यांनी टॉवरवर शोले स्टाईल (Sholay style movement on the tower ) आंदोलन सुरु केले आहे. तालुक्यांतील काही अंतरावर असलेले मंजरथ हे ऐतिहासीक धार्मिक स्थळ असुन धार्मिक विधी साठी प्रसिध्द आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. पण येथील मुख्य रस्त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. कारण रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता काही कळेना नागरीकांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत असुन बस सेवाही बंद झालेली आहे. पण याकडे माञ जि प बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष ( Neglect of District Construction ) असल्याने ग्रामस्थ थेट आयडिया टॉवरवर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी (Slogans against the administration at Idea Tower) करत आंदोलन सुरू आहे.

रस्त्यासाठी नागरिकांचे टॉवरवर सिनेस्टाईल आंदोलन


तीर्थ क्षेञाचा दर्जा प्राप्त : माजलगांव तालुक्यापासुन जवळपास ११ किलोमीटर वर गोदावरी नदीतीरावर वसलेले मंजरथ हे चार पाच हजार लोक संख्या असलेले गाव आहे. ऐतिहासिक वास्तु व धार्मिक विधी साठी गावाला तीर्थ क्षेञाचा दर्जा प्राप्त आहे. दक्षिण प्रयाग लक्ष्मी ञिविक्रम मंदिर गोदातीरावरील घाटासह लहान मोठी जवळपास ४० मंदिरे येथे आहेत. गोदावरी सिंदफना व गुप्त सरस्वती या नदीचा येथे ञिवेणी संगम आहे. त्यामुळे दशक्रिय विधिसह इतर धार्मिक विधीसाठी राज्यभरातुन दररोज शेकडो नागरिक येथे येतात. परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे मंजरथ ते माजलगाव रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना व शालेय विध्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना याचा ञास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी खूप दिवसापासून नागरिक विविध माध्यमातून करत आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर टॉवरवर चढून आंदोलन करण्याची वेळ नागरिकावर आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.