ETV Bharat / state

बीडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

author img

By

Published : Mar 9, 2021, 10:12 AM IST

विवेक सदाशिव कांबळे (वय 34) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची गेवराई पोलीस ठाण्यात नेमणूक झाली होती. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी उड्डाणपुलावर ते पेट्रोलिंग करत होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास कांबळे हे पोलीस व्हॅनमधून (एमएच 23 एफ 5143) उतरले असता अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.

बीड पोलीस कर्मचारी अपघात बातमी
बीड पोलीस कर्मचारी अपघात बातमी

बीड - रात्रगस्तीवर असेलेल्या गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना धूळे-सोलापूर महामार्गावर गढी उड्डाणपुलावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

विवेक सदाशिव कांबळे (वय 34) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची गेवराई पोलीस ठाण्यात नेमणूक झाली होती. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी उड्डाणपुलावर ते पेट्रोलिंग करत होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास कांबळे हे पोलीस व्हॅनमधून (एमएच 23 एफ 5143) उतरले असता अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. धडक दिलेल्या त्या अज्ञात वाहनांचा पोलीस शोध घेत आहेत. मागील चार दिवसात बीडमध्ये अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. रविवारी झालेल्या बीड-परळी मार्गावरील अपघातात पाच जणांचा बळी गेला होता.

हेही वाचा - पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळात शिरला कोरोना!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.