ETV Bharat / state

Sameer Sattar March : दुष्काळ जाहीर करण्यासाठी राज्याच्या मंत्र्यांच्या मुलाचा सरकार विरोधात मोर्चा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 4:50 PM IST

Sameer Sattar March
समीर सत्तारांचा मोर्चा

Sameer Sattar March : राज्यात अनेक तालुक्यात दुष्काळ (Drought in Sillod taluka) असूनही सरकारनं त्याची दखल न घेतल्यानं चक्क मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांच्याच मुलानं मतदारसंघात मोर्चा काढल्याचं समोर आलं. सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त तालुका घोषित करावा या मागणीसाठी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. (March on Sillod Tehsil Office)

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Sameer Sattar March : दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी देखील आंदोलन जाहीर केलं होतं. (Sameer Sattar March In Sillod) मात्र सरकारनं काही परिमंडळांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करून, इतर परिमंडळांचा लवकर समावेश होईल असं आश्वासन दिल्यानं आंदोलन रद्द करण्यात आलं. तर दुसरीकडे सत्तार यांच्या आंदोलनामुळे शिंदे गटाचा भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न तर नसावा अशी चर्चा आता रंगली आहे. (Sameer Sattar son of Abdul Sattar)

वडिलांच्या मतदार संघात मुलाचा मोर्चा : सिल्लोड मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहतो तो राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामुळे; मात्र आज पुन्हा एकदा हा मतदारसंघ चर्चेत आला तो त्यांचा मुलगा समीर सत्तार यांच्यामुळे. त्यांनी संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी केली. सिल्लोड तालुक्याची आणेवारी 50 टक्यांपेक्षा कमी आलेली आहे. यावरून सिल्लोड तालुक्यातील खरीप पिकांची दुष्काळाची दाहकता स्पष्ट होते. असे असताना देखील तालुका दुष्काळ यादीतून वगळण्यात आला होता. शुक्रवारी रात्री नवीन यादी जाहीर करण्यात आली; पण अनेक परिमंडळ पुन्हा वगळण्यात आल्यानं मोर्चा काढत असल्याचं मत समीर सत्तार यांनी व्यक्त केलं.

सरकार विरोधात मोर्चा नाही : अब्दुल सत्तार हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत. त्यामुळे आम्ही देखील सरकारचाच एक भाग आहोत. मात्र, आम्ही काढलेला मोर्चा सरकारच्या विरोधात नसून, मायबाप सरकारला परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी काढण्यात आल्याची माहिती समीर सत्तार यांनी दिली. पूर्ण तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त यादीमध्ये आला पाहिजे. सर्व नियमावली लागू व्हावी याकरिता आम्ही मोर्चा काढला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण होणार आहे. अनेक ठिकाणाहून टँकरचे प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे टँकर देखील चालू करावे, अशी आमची मागणी आहे. चारा छावणीची देखील गरज पडू शकते, त्याबाबत देखील उपयोजना करणं गरजेचं असल्याचं आंदोलनकर्ते समीर सतार यांनी सांगितलं.

भाजपाचा मोर्चा झाला रद्द : सिल्लोड परिमंडळात सरसकट दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी एकाच दिवशी शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार आणि भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारिया या दोघांनीही वेगवेगळी आंदोलनं करण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, शुक्रवारी सरकारच्या वतीनं दुष्काळग्रस्त परिमंडळांची नवीन यादी जाहीर केली. त्यात सिल्लोड तालुक्यातील काही परिमंडळांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे भाजपानं आपलं आंदोलन स्थगित केलं. इतर परिमंडळ लवकर समाविष्ट होतील, असं आश्वासन मिळाल्यानं आंदोलन स्थगित केल्याचं कमलेश कटारिया यांनी सांगितलं होतं. परंतु, समीर सत्तार यांनी आपलं नियोजित आंदोलन केलं. त्यामुळे भाजपाला वरचढ ठरण्यासाठी तर हे आंदोलन नाही ना? असा देखील प्रश्न उपस्थित होतोय.

हेही वाचा:

  1. Sharad Pawar On Diwali : पवारांची दिवाळी! माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येतात,संकटांना तोंड द्यावं लागतं - शरद पवार, पाहा व्हिडिओ
  2. Sanjay Raut On CM : मुंब्र्यात विरोधकांच्या छातीवर पाय देऊन समाचार घेणार; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
  3. Manoj Jarange Patil : दिवाळीत नेत्यांच्या घरी फराळाला गेल्यावर त्यांना 'हे' विचारा, मनोज जरांगे यांचं आवाहन काय?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.