ETV Bharat / state

Melghat Water Shortage : मेळघाटाला पाणी टंचाईचे चटके; दोन तास हापसल्यावर हंडाभर मिळते पाणी

author img

By

Published : May 15, 2023, 4:22 PM IST

Updated : May 15, 2023, 10:07 PM IST

एकीकडे पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये म्हणून, पालिका पाणी पुरवठ्याचे विभागावर नियोजन करत आहे. तर अमरावती येथील मेळघाटातील कोहाना गावात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. गावातील चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सारेच पाण्यासाठी मोठा संघर्ष करत आहेत. या गावात एकच हात पंप (हापसा) असून, त्याचे पाणीही खोल गेले आहे. त्यामुळे तब्बत दोन ते तीन तास हा हापसा सुरू ठेवल्यावर हंडाभर पाणी नागरिकांना मिळते.

Water Scarcity In Kohana
गावाला पाणी टंचाईचे चटके

पाण्यासाठी महिलांची वणवण

अमरावती : पाणी टंचाईमुळे राज्यातील एका गावात गावकऱ्यांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील कोहाना हे गाव. गावात एक हापसा अन् नळ असून त्यालाही पाणी येत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना दोन कधी तीन तास सतत हापसावे लागते तेव्हा कुठे हापसाला पाणी येते.

पाण्यासाठी मोठा संघर्ष : गावात पाण्याचे दोन हापसे आहेत. त्यातील एक वर्षभरापासून बंद आहे. तर दुसरा दोन तास हापसल्यावर कसेबसे त्याला पाणी येते. मेळघाटातील कोहाना गावचे हे भीषण वास्तव आहे. कोहाना प्रमाणे मेळघाटातील अनेक गावात असेच चित्र आहे. गावातील चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सारेच पाण्यासाठी मोठा संघर्ष करत आहेत.

दोन कधी तीन तास सतत हापसावे लागते, तेव्हा कुठे हापसाला पाणी येते. घराजवळ हापसा आहे. मात्र, तीन वर्षांपासून तो बंद आहे. गावात असणाऱ्या या दुसऱ्या हापसाचे पाणी फार खोल गेले आहे. पाण्यासाठी मात्र असच तासंतास हापसणं फार कठीण काम आहे - सामोती मावस्कर, वृद्ध महिला

पाणी हापसून लागतो दम : सुमारे आठशे लोकसंख्या असणारे गाव मेळघाटाची सुरुवात होताच धारणाकडे जाणाऱ्या मार्गावर उजव्या हाताला डोंगरावर आहे. या गावात भर उन्हात सामोती मावस्कर ही वृद्ध महिला हापसातून पाणी मिळेल या आशेने सुमारे दीड-दोन तास हापसून प्रचंड दमली होती. त्या महिलेने बोलताना सांगितले की, दोन कधी तीन तास सतत हापसवे लागते, तेव्हा कुठे हापसाला पाणी येते. त्याच्या घराजवळ हापसा आहे मात्र, तीन वर्षांपासून तो बंद आहे. गावात असणाऱ्या या दुसऱ्या हापसाचे पाणी फार खोल गेले आहे. पाण्यासाठी मात्र असच तासंतास हापसण फार कठीण काम असल्याचे दुःख देखील सामोती मावसकर यांनी व्यक्त केले.



गावात नळ योजना पाणी मात्र बेपत्ता: कोहाना या गावातील आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी, नळ योजना राबवून घरोघरी नळ बसविण्यात आले आहेत. दुर्दैव मात्र या नळांना कधीच पाणी येत नाही. गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य कोणीही या अडचणीची दाखल घेत नाहीत. बाहेरून कोणी प्रशासकीय अधिकारी ग्रामस्थांच्या अडचणी समस्या जाणून घ्यायला कधी येत नाही. अशी परिस्थिती कोहाना गावात आहे.



गावात पाण्याची भीषण स्थिती आहे. त्यामुळे एकाच हापसावर पाणी भरण्यासाठी यावे लागते. दोन, तीन तास हापसल्यानंतर कुठे हंडाभर पाणी मिळते. त्यामुळे एवढा वेळ हापसल्यामुळे दम लावतो व त्रासही होतो - पाणी भरण्यासाठी आलेली महिला

दूर अंतरावर आहे विहीर : कोहाना या गावापासून दीड की. मि अंतरावर विहीर आहे. या विहिरीत दिवसभर थोडाफार पाणी रहात. पहाड उतरून आणि जंगलाच्या वाटेतून या विहिरवरून एका वेळेस एक हंडाभर पाणी आणता येते. विहिरीचे पाणी आणणे हे देखील प्रचंड कठीण आहे. मात्र पर्याय नसल्याने वृद्ध महिला देखील भर उन्हात पाण्यासाठी या वेदना सहन करताना दिसत आहे. दोन की.मि अंतरावर नदी काठी आणखी एक हापसा आहे. त्याठिकाणावरून देखील पाणी आणणे सोपे नाही.



उपाययोजनांवरचा खर्च कागदावरच का? : अमरावती जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी 668 गावात विविध प्रकारच्या 800 उपाययोजनांवर एकूण 12 कोटी 43 लाख 82 हजार रुपयांचा कृती आराखडा जिल्हा प्रशासनाने आखला. मात्र हे सारे काही कागदोपत्रीच आहे का? अशी शंका कोहाना गावातील भीषण परिस्थिती पाहताना येते. कोहानासह मेळघाटात चिखलदरा आणि धारणी या दोन्ही तालुक्यात अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेले अनेक गाव उष्णतेच्या लाटेत तहानलेले असणे, हे लोकप्रतिनिधी, शासन आणि प्रशासनासाठी शोभणारे नाही, असे बोलले जात आहे.


हेही वाचा -

  1. Mothers Day 2023 मेळघाटात मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी राबवला जात आहे हा अभिनव उपक्रम
  2. Gurukul Method of Education वडाच्या झाडाखाली संस्काराची शिदोरी आजीबाईंचा 25 वर्षांपासून उपक्रम
  3. Shami Plant Significance शमीसाठीच झाले पहिले चिपको आंदोलन या झाडाचे आहे धार्मिक सांस्कृतिक आणि आयुर्वेदिक महत्त्व
Last Updated : May 15, 2023, 10:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.