ETV Bharat / state

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना वाघाचे दर्शन

author img

By

Published : Jul 1, 2020, 12:51 PM IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात काल (मंगळवार) एका वाघाने पर्यटकांना शानदार दर्शन दिले. याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मागील तीन महिन्यांपासून बंद असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प २० जूनपासून जंगल सफारीकरता सुरू करण्यात आला.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना वाघाचे दर्शन

अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात काल एका वाघाने पर्यटकांना शानदार दर्शन दिले. याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मागील तीन महिन्यांपासून बंद असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प २० जूनपासून जंगल सफारीकरता सुरू करण्यात आला. त्यामुळे आता वन्यजीवप्रेमी हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी येत आहेत. अशाच काही पर्यटकांना काल टीपेश्वर अभयारण्यातील एका वाघाने दर्शन दिले आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांना वाघाचे दर्शन
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शेकडो विविध प्रजातीचे प्राणी आहे. पंरतु नेहमी या व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची वर्दळ असते. यामुळे हे प्राणी मुक्तसंचार करताना क्वचितच पाहायला मिळतात. पण, सध्या कोरोनामुळे पर्यटकांची संख्या कमी आहे. त्यामुळे वन्यजीव मुक्त संचार करत आहे.

महाराष्ट्रातील हा पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे. २२ फेब्रुवारी १९७४ साली भारतात एकूण ९ अभयारण्यांना व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. यात मेळघाटचा समावेश होता. मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणातील वाघ पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी येथे येतात. या व्याघ्र प्रकल्पात एकूण 35 वाघांचा संचार आहे. ६ मे व ७ मे रोजी मेळघाटमध्ये प्राण्यांची गणना करण्यात आली. त्यानुसार, मेळघाटात १७ हजार १८५ प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. यात ३५ वाघांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ४० बिबटे, ३४० अस्वल, १७२ रानकुत्रे, तर ७५२ गवे आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.