ETV Bharat / state

Statue of Shivaji Maharaj Removed : अमरावतीत पुतळ्यांचे राजकारण; शहरासह दर्यापूरमध्ये तणाव

author img

By

Published : Jan 16, 2022, 1:45 PM IST

शहरासह दर्यापूरमध्ये तणाव
शहरासह दर्यापूरमध्ये तणाव

दर्यापूर येथे शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढोल-ताशासह बसविण्याचा प्रयत्न ( Shivaji Maharaj Statue in Daryapur ) केला. मात्र प्रशासनाने पुतळा जप्त करण्याची कारवाई केली आहे. तसेच लहुजी संघटनेच्या वतीने अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ( Lokshahir Annabhau Sathe Statue ) बसविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पुतळ्याच्या राजकारणामुळे सध्या अमरावतीसह दर्यापूर शहरात तणावसदृश्य परिस्थिती आहे.

अमरावती - शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकल्यामुळे ( Shivaji Maharaj Statue Removed in Amravati ) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे पडसाद दर्यापुरात देखील उमटताना दिसत आहे. दर्यापूर येथे शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढोल-ताशासह बसविण्याचा प्रयत्न ( Shivaji Maharaj Statue in Daryapur ) केला. मात्र प्रशासनाने पुतळा जप्त करण्याची कारवाई केली आहे. तसेच लहुजी संघटनेच्या वतीने अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ( Lokshahir Annabhau Sathe Statue ) बसविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पुतळ्याच्या राजकारणामुळे सध्या अमरावतीसह दर्यापूर शहरात तणावसदृश्य परिस्थिती आहे.

अमरावतीत पुतळ्यांचे राजकारण; शहरासह दर्यापूरमध्ये तणाव

दर्यापुरात शिवसैनिकांवर कारवाई -

दर्यापूर येथे शिवसैनिकांनी शनिवारी रात्री ढोल ताशे वाजवत महाराजांचा पुतळा शहराच्या मध्यवर्ती चौकात बसविला होता. हा पुतळा बसविण्यासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाने पुतळा जप्त केला. तसेच शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दर्यापूरमध्ये तणाव
दर्यापूरमध्ये तणाव

लहुजी संघटनेच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई -

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याचा प्रयत्न रविवारी पहाटे लहुजी संघटनेच्या वतीने करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी धडक कारवाई करत संबंधित पुतळा जप्त केला असून लहुजी संघटनेचे डॉ.रुपेश खडसे यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे.

शहरात तणावपूर्ण शांतता

राजापेठ उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिका प्रशासनाच्यावतीने हटवण्यात आल्यानंतर सकाळी काही काळ राजापेठ उड्डाणपुलासह आमदार रवी राणा यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानाच्या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावून परिस्थिती आटोक्यात आणली. सध्या राजापेठ उड्डाणपूल आणि शंकरनगर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. शहराच्या इतर भागात मात्र या संपूर्ण घटनाक्रमाचा विशेष असा परिणाम जाणवत नाही.

शहरासह दर्यापूरमध्ये तणाव
शहरासह दर्यापूरमध्ये तणाव

आमदार राणा यांच्या घरासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त -

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानी पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. त्यामुळे युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या घरासमोर जमले आहेत. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी कुठलीही गडबड करू नये यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकडीसह दंगा नियंत्रण पथक आणि पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे. आमदार राणा यांच्या घरालगत दोन्ही बाजूने बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.

आमदार राणा यांच्या घरासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
आमदार राणा यांच्या घरासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.