ETV Bharat / state

ST Worker Strike : गुणरत्न सदावर्तेंनी आमच्या भावनांचा खून केला; एसटी कामगार संघटना राज्याध्यक्षांचा आरोप

author img

By

Published : Jan 27, 2023, 9:43 PM IST

Updated : Jan 27, 2023, 10:35 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

एसटी कामगारांचा संप चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप एसटी कामगार संघटनानी केला आहे. महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच सदावर्ते यांनी आमच्या भावनांचा खून कल्याचे ते म्हणाले.

गुणरत्न सदावर्तेंनी आमच्या भावनांचा खून केला

अमरावती : गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांचा संप चुकीच्या पद्धतीने हाताळला. विलीनकरणाची सोपी असलेली लढाई चुकीच्या पद्धतीने हाताळून कठीण करून ठेवली. एवढेच नव्हे तर, त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात राजकारण केले. सदावर्ते यांनी आमच्या भावनांचा शांत डोक्याने खून केला असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत केला.

एसटी कर्मचारी संघटनेची खंत : बोलताना ते पुढे म्हणाले की, राज्य परिवहन महामंडळ हे आशिया खंडातील मोठे महामंडळ आहे. परंतु या महामंडळाचे खाजगीकरण करण्याचा घाट राज्य सरकारने घालत आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे महामंडळ प्रचंड अडचणीत आले आहे. लाल परीला ग्रहण लागले आहे. चुकीच्या नेतृत्वामुळे एसटी महामंडळावर हा संप लादला गेला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

गुणरत्न सदावर्ते केला खून : गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली. एका राजकीय पक्षाने त्यांना या कामासाठी मुद्दामहून आयात केले होते. आमच्या संघटनेत, कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पाळण्याचे प्रयत्न सदावर्ते यांनी केले. त्यांनी आमचा शांत डोक्याने खूनच केला असा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला.


एकतर्फी पॅकेज जाहीर : सन २०१६-२०२० च्या कामगार करारासाठी शासनाने ४ हजार ८४९ कोटीचे पॅकेज एकतर्फी जाहिर केले. कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय दराने घरभाडे, भत्याचा दर ८१६ म्हणजे २४ टक्के, तर वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के लागू होता. परंतु ४ हजार ८४९ कोटीची वेतनवाढ जाहिर करताना घरभाडे भत्याच्या दरामध्ये ८, १६, २४ टक्क्याऐवजी ७,१४,२१ टक्के व वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्याऐवजी २ टक्के असा एकतर्फी कमी केला. तसेच जाहिर झालेल्या ४ हजार ८४९ कोटीचे एकतर्फी वाटप करताना शिल्लक असलेल्या रक्कमेचेही वाटप कामगारांना न झाल्यामुळे करारावर संघटनेने स्वाक्षरी केलेली नाही.

मॅक्स कॅबला आमचा विरोध : तसेच पोलिस वसाहतीस रा.प. महामंडळाच्या जागा देण्यास संघटनेने तीव्र विरोध केलेला आहे. मॅक्स कॅब वाहनांना राज्य शासनाने परवानगी देऊ नये असेही संघटनेने लेखी पत्राव्दारे यापुर्वीच कळवले असल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला सदाशिव शिवणकर, विजय साबळे, सुधाकर दिवाने ,मोहित देशमुख ,अस्लम भाई उपस्थित होते.

हेही वाचा - Nitin Gadkari on Palkhi Route : आळंदी-पंढरपूर पालखी मार्ग तीन महिन्यात पूर्ण करणार - नितीन गडकरी

Last Updated :Jan 27, 2023, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.