ETV Bharat / state

Health Check Ups of Drivers : अमरावतीत शासकीय वाहनांवरील चालकांची होते नियमित आरोग्य तपासणी; अपघाताचे प्रमाण नगण्य

author img

By

Published : Mar 30, 2022, 3:12 PM IST

Updated : Mar 30, 2022, 4:35 PM IST

राज्य परिवहन मंडळ असो अग्निशमन विभाग तसेच पोलीस अशा सर्व महत्त्वाच्या शासकीय यंत्रणेत सेवा देणारे वाहन चालक ( government service drivers in Amravati city ) हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. अमरावती शहर आणि जिल्ह्यात शासकीय सेवेतील वाहनचालकांच्या आरोग्याची काळजी ( health care of drivers in Amravati ) बहुतांश विभाग घेत असल्याचे ई टिव्ही भारतच्या सर्वेक्षणात ( Etv Bharat Survey of drivers ) दिसून आले.

सरकारी वाहन
सरकारी वाहन

अमरावती - मंत्र्याच्या वाहनावरील चालकाची तपासणी करण्यात आली नव्हती, हा मुद्दा खुद्द केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत उपस्थित केला होता. प्रत्यक्षात शासकीय सेवेतील वाहनचालकांच्या आरोग्याची काय काळजी घेण्यात येते, याची पाहणी ईटीव्ही भारतने केली आहे. त्याबाबतचा हा रिपोर्ट वाचा.

राज्य परिवहन मंडळ असो अग्निशमन विभाग तसेच पोलीस अशा सर्व महत्त्वाच्या शासकीय यंत्रणेत सेवा देणारे वाहन चालक ( government service drivers in Amravati city ) हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. अमरावती शहर आणि जिल्ह्यात शासकीय सेवेतील वाहनचालकांच्या आरोग्याची काळजी ( health care of drivers in Amravati ) बहुतांश विभाग घेत असल्याचे ई टिव्ही भारतच्या सर्वेक्षणात ( Etv Bharat Survey of drivers ) दिसून आले. सरकारच्या विविध योजना समाज हितासाठी राबविल्या जातात. त्याची संपूर्ण जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वाहनावरील चालकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरते. विविध प्रशासकीय विभागातील मुख्य अधिकाऱ्यांबरोबरच वाहनांचे चालक हेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.

चालकांची होते नियमित आरोग्य तपासणी

बस चालकांची वाढदिवसाला होते आरोग्य तपासणी- महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ हे राज्यातील एका टोकावरील जिल्ह्याला दुसऱ्या टोकाशी जोडणारे अत्यंत महत्त्वाचे असे घटक आहेत. राज्य परिवहन महामंडळावर राज्यातील प्रत्येक प्रवाशांचा विश्वास आहे. राज्य परिवहन महामंडळाने सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केलेल्या विश्वसामध्ये बस चालकांची भूमिका सर्वात अग्रस्थानी आहे. यामुळेच अगदी अनोळखी असणाऱ्या बस चालकांच्या भरवशावर लाखो प्रवासी प्रवास करतात. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकात एकूण 113 बस चालक आहेत. या सर्व बस चालकांची नियमित आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी केली जाते. प्रत्येक चालकाच्या वाढदिवसाला परिवहन मंडळाच्यावतीने संपूर्ण आरोग्य तपासणी केली जाते. ही माहिती 22 वर्षांपासून अमरावती आगारात कार्यरत असणारे बसचालक मारोती राठोड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

अमरावती आगारात सोबतच जिल्ह्यात असणाऱ्या परतवाडा, मोर्शी, चांदूर बाजार, चांदुर रेल्वे, वरुड, या सर्व आगारात असणाऱ्या एकूण 2400 बसचालकांच्या आरोग्याची तपासणी नियमित केली जाते. तसेच त्यांची नेत्रतपासणीसुद्धा आवर्जून करण्यात येत असल्याचेही मरोती राठोड यांनी सांगितले. चालकाच्या वाढदिवसाला खास आरोग्य चाचणी केली जाते. तरी वर्षातून एकदा सर्व बस चालकांची आरोग्य तपासणी केली जाते. यासोबतच शहर आणि जिल्ह्यातील काही सामाजिक संघटनांच्यावतीनेही नेत्र तपासणी शिबीर केली जाते. तसेच आरोग्य तपासणी शिबिर वर्षातून दोन ते तीन वेळा आगारात होत असल्याची माहितीसुद्धा मारोती राठोड यांनी दिली.


अग्निशमन दलाचे चालकही सुदृढ-अमरावती महापालिकेतील अत्यंत महत्त्वाचा विभाग असणाऱ्या अग्निशमन दलात एकूण 32 चालक आहेत. यापैकी सहा चालकच नियमित असून इतर सर्व हे कंत्राटी तत्त्वावर आहेत. अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या अग्निशमन विभागातील प्रत्येक चालकाच्या आरोग्याची वर्षातून एकदा नियमित आरोग्य तपासणी केली जाते. या विभागातील 80 टक्के चालक नवयुवक आहेत. तर इतर 20 टक्के चालक यांनी पन्नाशी गाठली आहे. तरी त्यांची नजर मात्र तीक्ष्ण असल्याचे अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांसह वाहनचालकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. महापालिकेच्या अग्निशमन विभागात सह इतर विभागातील वाहन चालकांची सुद्धावर्षातून एकदा नियमित आरोग्य तपासणी केली जाते. चालकांना आरोग्य संदर्भात काही अडचणी जाणविल्या तर त्यांच्यावर योग्य उपचारही केला जात असल्याचे वाहनचालक संतोष डोईफोडे यांनी सांगितले.

आरोग्याबाबत पोलीस दलातील चालक दक्ष- 24 तास अलर्ट राहणाऱ्या पोलीस दलाची संपूर्ण मदार ही चालकावरच अवलंबून आहे. यामुळे पोलीस दलातील चालकांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती अमरावती शहर पोलीस परिवहन विभागाचे ड्युटी मदतगार विजय धूर्वे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. अमरावती शहरातील गाडगे नगर, फ्रेझरपुरा, बडनेरा ,राजापेठ शहर कोतवाली खोल्हापुरी गेट, नागपुरी गेट, वलगाव, नांदगाव पेठ आणि भातकूली या पोलीस ठाण्यात एकूण 47 चालक आहेत. तसेच पोलीस परिवहन विभागात 118 चालक कार्यरत आहेत. या चालकांची शासनाच्यावतीने वर्षाला एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये नेत्र तपासणीवर विशेष भर दिला जातो. यासोबतच विविध सामाजिक संघटनेच्यावतीने दोन वेळा आरोग्य तपासणी केली जात असल्याचे विजय धुर्वे यांनी सांगितले.

सर्वच विभागात घेतली जाते चालकांच्या आरोग्याची काळजी- अमरावती जिल्ह्यातील पोलीस दलासह जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि महसूल विभागातील चालकांच्या आरोग्याची काळजी प्रामुख्याने घेतली जाते. प्रत्येक चालकाची वर्षातून एकदा शासनाच्यावतीने आरोग्यासह नेत्र तपासणी केली जाते. मोतीबिंदू किंवा डोळ्याच्या बाबतीत असणारे आजार अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाच्या विभागांमध्ये नगण्य असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रपेढीच्या वतीने शासकीय वाहनचालकांच्या डोळ्यांची नियमित तपासणी केली जाते. अनेकदा विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रपेढी शासकीय वाहन वाहनचालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करते. काही वर्षांपासून शासकीय विभागातील वाहन चालकाकडून कुठलाही अपघात किंवा दारू पिऊन वाहन चालविणे असा कुठलाही अनुचित प्रकार सुदैवाने घडलेला नाही.

चालकांच्या तपासण्याबाबत गडकरींनी संसदेत उपस्थित केला होता प्रश्न- चालकांच्या डोळ्यांची चांगल्या तपासणी करून घ्या. एका मंत्र्याच्या चालकाला डोळ्याने नीटसे दिसत नव्हते. आपल्या देशात सहजरित्या ड्रायव्हिंग लायसन ( Driving license permission in India ) मिळते. त्याबाबत संसदेने विचार करावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari in Parliament ) यांनी नुकतेच केले होते.

हेही वाचा-ही एक सदिच्छा भेट... भाजप नेते वरूण गांधी यांच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

हेही वाचा-Rajesh Tope on Mask Free Maharashtra : राज्यात मास्क मुक्तीबाबत तूर्तास निर्णय नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

हेही वाचा-Rana's Complaint In Lok Sabha : चार बड्या पोलीस अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयाची थेट नोटीस

Last Updated : Mar 30, 2022, 4:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.