ETV Bharat / state

Rana's Complaint In Lok Sabha : चार बड्या पोलीस अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयाची थेट नोटीस

author img

By

Published : Mar 30, 2022, 1:15 PM IST

Updated : Mar 30, 2022, 3:19 PM IST

अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह (Commissioner of Police Dr. Arti Singh) आणि माजी पोलिस उपायुक्त शशिकांत सातव (Former DCP Shashikant Satav) यांच्याकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीबाबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी संसदीय विशेषाधिकार समितीकडे दाखल केली होती. या तक्रारीवरून आता राज्यातील चार बड्या अधिकारांना ( four senior police officers) लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश (Direct notice from Lok Sabha Secretariat ) बजावण्यात आले आहे.

MP Navneet Rana
खासदार नवनीत राणा

अमरावती / मुंबई : अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर सिंह यांच्या विरोधात खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, (DGP Rajneesh Seth) मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, (CP Sanjay Pandey) अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि अमरावतीचे माजी पोलीस उपयुक्त आणि अमरावती जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत सातव यांना 6 एप्रिलला दुपारी तीन वाजता लोकसभा सचिवालयात हजर राहावे लागणार आहे. यासंदर्भात लोकसभा सचिवालयाचे उपसचिव बाला गुरुजी यांच्या स्वाक्षरीसह पत्र दिले आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळत नसल्याच्या निषेधार्थ खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांनी ऐन दिवाळीत आंदोलन छेडले होते. त्यावेळी दोघांनाही पोलिसांनी आधी नजर कैदेत ठेवून नंतर पोलीस आयुक्तालयात नेले होते. त्यावेळी पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि पोलिस उपायुक्त शशिकांत सातव यांनी चुकीची वागणूक देऊन खासदारांचा अवमान केल्याची तक्रार खासदार नवनीत राणा यांनी संसदेच्या विशेष अधिकार समितीकडे दिली होती.

चार बड्या पोलीस अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयाची थेट नोटीस

14 नोव्हेंबर 2020 दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यानंतर 15 नोव्हेंबर 2020 दिवशी हे दोघेही शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री यांच्या मातोश्रीवर जाऊन निवेदन देणार होते. पण पोलिसांनी सायंकाळी त्यांना घरूनच ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले होते. यावेळी खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापले होते आणि त्यांनी तेव्हाच सांगितले होते की, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत बोलावून यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला लावणार आहे. याच प्रकरणाची तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष यांना 12 जानेवारी 2021 ला करण्यात आली होती. त्या तक्रारींवर इतर 4 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ज्यामध्ये भारती पवार आणि हिना गावित यांचा देखील समावेश आहे आणि अखेर लोकसभा सचिवालय मधून 24 फेब्रुवारी 2022 ला उपसचिव यांनी 9 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त, अमरावती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग आणि तत्कालीन अमरावती पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांना उपस्थित राहण्याची नोटीस वाजवण्यात आली आहे. आता 6 एप्रिल दिवशी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये आता पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना देखील हजर राहावे लागणार आहे.




काय आहे प्रकरण ? : 2020 मध्ये अमरावती जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे शेतीचे खूप नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि वीजबिल 50 टक्के माफ करावे याकरिता आमदार रवी राणांनी शेतकऱ्यांना घेऊन 13 नोव्हेंबर 2020 ला अमरावती- नागपूर महामार्ग मोझरी येथे एक नाही तर तब्बल २ तास रास्तारोको आंदोलन करण्यात आला होता. यावेळी तिवसा येथे टायरची जाळपोळ देखील करण्यात आला होता. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या आंदोलनामुळे आमदार रवी राणा यांच्यासह 18 शेतकऱ्यांना तिवसा पोलीसांनी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यावेळी आमदार रवी राणानी दिवाळी न्यायालयीन कोठडीत काढली आहे.

Notice to senior police officers
बड्या पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस

हेही वाचा : Home Minister On Bjp : लोकांमध्ये फूट निर्माण करण्याचे भाजपचे राजकारण

Last Updated : Mar 30, 2022, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.