ETV Bharat / state

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

author img

By

Published : Aug 6, 2019, 10:16 AM IST

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी गेल्या १७ जुलैला विशेष आमसभा घेण्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर या विषयावर संघटनेला चर्चेसाठी बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाने यापैकी काहीच केले नाही.

अमरावती - महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सोमवारी सकाळपासून बेमुदत संप पुकारला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होतो. मात्र, कर्मचाऱ्यांना लागू केला जात नसल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केला.

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वारसमोर एकत्र येत निदर्शने केली. महापालिकेच्या आस्थापनेवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे. सातव्या वेतन आयोगाची ४ महिन्यांची थकाबाकीही अधिकाऱ्यांनी घेतली आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी गेल्या १७ जुलैला विशेष आमसभा घेण्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर या विषयावर संघटनेला चर्चेसाठी बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाने यापैकी काहीच केले नाही. त्यामुळे कामबंद आंदोलन केले असल्याचे महापालिका कर्मचारी संघटनेचे प्रमुख प्रल्हाद कोतवाल यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सोमवारी महापालिकेचे काम ठप्प पडले होते.

Intro:अमरावती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू होतो आणि कर्मचाऱ्यांना तो लागू करण्यात येत नाही हा अन्याय असून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला नाही तर संप बेमुदत सुरू राहील असा इशारा महापालिका कर्मचारी संघटनेने दिला आहे.


Body:आज सकाळी महापालिका कर्मचारी आणि अधिकारी महापालिकेच्या मुख्य प्रवेशदवरसमोर एकत्र आलेत आणि प्रशासनाविराधात त्यांनी जोरदार निदर्शन केले. महापालिकेच्या आस्थापनेवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळतो आहे. सातव्या वेतन आयोगाची चार महिन्यांची थकबाकीही अधिकाऱ्यांनी घेतली आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यासाठी 17 तारखेला विशेष आमसभा घेऊ असे सांगण्यात आले नंतर या विषयावर संघटनेला चर्चेसाठी बोलाविण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. मात्र या पैकी काही एक प्रशासनाने केले नाही म्हणून आम्ही कामबंद आंदोलन छेडले असल्याची माहिती महापालिका कर्मचारी संघटनेचे प्रमुख प्रल्हाद कोतवाल यांनी दिली. कर्मचाऱ्यांचा संपामुळे आज महाऑलिकेचे काम ठप्प पडले होते.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.