Akola Shiv Sena Leader Murder : अकोल्यात शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची हत्या, मृतदेह तलावात फेकला

author img

By

Published : Sep 3, 2022, 10:09 AM IST

Shiv Sena deputy chief killed in Akola

शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुख याची गळा आवळून Shiv Sena deputy chief killed in Akola हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर मृतदेह तलावात फेकून body thrown lake in Akola देण्यात आला. भागवत अजाबराव देशमुख Bhagwat Ajabrao Deshmukh (वय २८, राहणार कौलखेड, अकोला.) असं हत्या Murder in Akola करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

अकोला - अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुख याची गळा आवळून Shiv Sena deputy chief killed in Akola हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर मृतदेह तलावात फेकून body thrown lake in Akola देण्यात आला. भागवत अजाबराव देशमुख Bhagwat Ajabrao Deshmukh (वय २८, राहणार कौलखेड, अकोला.) असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, हत्या करून भागवतचा मृतदेह तलावाच्या पाण्यात राहल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आले. याप्रकरणी पातुर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

कापशीच्या तलावात अनोळखी युवकाचा मृतदेह - २७ ऑगस्टला पातुर पोलीस स्टेशन हद्दीतील कापशीच्या तलावात अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. मात्र, वैद्यकीय तपासणीच्या अहवालात या युवकाची हत्या Murder of Shiv Sena sub city chief in Akola झाल्याचं समोर आलं आहे. आता पोलिसांनी या प्रकरणात खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, तलावाच्या पाण्यात दोन दिवसापासून मृत्यू पडून असल्याने युवकाची ओळख पटवने पोलिसांसाठी कठीण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर २९ ऑगस्ट रोजी अंत्यविधी केली. दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी पुन्हा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तलावाच्या परिसरातील पाहणी केली असता अर्धा कमी अंतरावर एका रुमालमध्ये आधार कार्ड आणि इतर काही वस्तू आढळून आल्या. या संदर्भात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या युवकाची बेपत्ता असल्याची तक्रार अकोल्यातीलच खदान पोलीस स्टेशन इथे दाखल होती. दरम्यान, भागवत अजाबराव देशमुख असं या युवकाची ओळख पटली.

'भागवत' २५ ऑगस्टपासून होता बेपत्ता... नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत देशमुख गेल्या २५ ऑगस्ट पासून बेपत्ता होता, त्याचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र कुठलाही सुगावा हाती लागला नव्हता. अखेरस नातेवाईकांनी भागवत बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दाखल केली. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी नातेवाईकांना या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली की, भागवत याची हत्या झाली असून तेव्हा कुठलेही ओळख न भेटल्याने पोलिसांकडून त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला आहे. हे समजतात कुटुंबीयांना धक्का बसलाय.

आधी गळा आवळला, नंतर मृतदेह तलावात फेकला.. दरम्यान, पातुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत देशमुख याचा अज्ञातांनी आधी गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला असे वैद्यकीय अहवालात समोर आला आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींनी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवतची हत्या २५ ऑगस्ट रोजी झाली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या या घटनेने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

भागवत देशमुख नेमके कोण आहेत? भागवत देशमुख सुरुवातीला शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे वाहन चालक म्हणून होते. दरम्यान, काही वर्षानंतर भागवतने आपला प्रवास राजकीय क्षेत्रात वळविला. आता २३ ऑगस्टला अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात भागवतने प्रवेश केलाय. शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया Former MLA Gopikishan Bajoria यांच्या निवासस्थानी त्याने जाहिर प्रवेश केला होता. त्याच्या खांद्यावर शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली होती.

हेही वाचा - लस घेतल्यानंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे भारत सरकार, सीरम इन्स्टिट्यूटला नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.