ETV Bharat / state

Fire at Garage : वाशिम बायपासवरील गॅरेजला आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

author img

By

Published : Apr 6, 2022, 10:52 AM IST

गॅरेजला आग
गॅरेजला आग

वाशिम बायपास जवळ असलेल्या गॅरेजला आज सकाळी सात वाजता आग लागली. या आगीमध्ये गॅरेजमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. ऑइल आणि टायर व इतर साहित्य पूर्णपणे जळाले आहे. ही आग नेमकी कशामुळे हे अद्याप समजू शकले नाही.

अकोला - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील वाशिम बायपास जवळ असलेल्या गॅरेजला आज सकाळी सात वाजता आग लागली. या आगीमध्ये गॅरेजमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. ऑइल आणि टायर व इतर साहित्य पूर्णपणे जळाले आहे. ही आग नेमकी कशामुळे हे अद्याप समजू शकले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. ही आग विझविण्यात दुपार होऊ शकते, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी मनीष कथले यांनी दिली. या गॅरेजमध्ये मोठ्याप्रमाणात ऑइल आणि टायर असल्याने आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

वाशिम बायपासवरील गॅरेजला आग

आगीच कारण अस्पष्ट - आग नेमकी कशामुळे हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, हे विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा ते बारा बंबांनी प्रयत्न केले. उशिरापर्यंत ही आग चालू होती. आगीमध्ये ऑइल आणि टायर व इतर मोटर स्पेअर पार्ट जळून खाक झाले आहे. आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. आग मोठ्या प्रमाणात लागली असल्यामुळे ही आग पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी आले होते. त्यांनी वाहतुकीची कोंडी दूर केली. तसेच घटनास्थळापासून नागरिकांना दूर केले. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. दुकानाचे शटर तोडण्यासाठी जेसीबीचा उपयोग करण्यात आला. आगीच्या धुरीचे लोट मोठ्या प्रमाणात निघत होते.

आग विझवण्यास मदत - हिंदुस्थान मोटर्स पार्टस अँड ओल्ड मोटर्स पार्टस असे गॅरेजचे नाव असून इमरान अहमद यांचे हे गॅरेज आहे. त्यांना माहिती मिळताच त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एसीमुळे ही आग लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, अजूनपर्यंत ही आग नेमकी लागली कशामुळे हे समजू शकले नाही. जुने शहर पोलीस, शहर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी नागरिकांना दूर केले. तसेच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. ही आगा चार तास झाले तरी अजूनही सुरूच होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.