ETV Bharat / state

Devendra Fadnavis On Sanjay Raut : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच चर्चा होणार; तर संजय राऊत 'त्या' लायकीचे नाहीत...देवेंद्र फडणवीस यांची टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 10:50 PM IST

Updated : Oct 8, 2023, 10:57 PM IST

Devendra Fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis On Sanjay Raut: राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच (Cabinet Expansion soon) करण्यात येणार आहे. त्यासाठी बैठका सुरू आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. तसेच मी उत्तर द्यावे इतके संजय राऊत मोठे नाहीत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली. ते अकोला दौऱ्यावर असताना बोलत होते.

अकोला Devendra Fadnavis On Sanjay Raut: अकोल्यात आयोजित कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नांदेडची घटना विरोधकांनी अतिशयोक्ती करू नये, अशा घटनांची गांभीर्याने दखल घ्यावी. या घटनेनंतर शक्य तितक्या कोणत्या सुविधा देता येतील याचा विचार केला जात आहे, असेही त्यांनी सांगितलं. संजय राऊत (Sanjay Raut) यांना 'मी' कधीच उत्तर देत नाही, कारण ते लायक नाहीत, म्हणजेच ते काहीही बोलतात, काहीही बोलले तर त्याला उत्तर कसे द्यायचे, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना (Devendra Fadnavis Criticizes Sanjay Raut) लगावला आहे. उद्धव ठाकरेंची संघटना राम राज्याबाबत बोलते याचा मला आजही आनंद आहे, पण त्यांनी राम राज्याची संकल्पना आधीच सोडून दिली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.



सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करणार : आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिला असून, अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल. गरजूंना आवश्यक उपचार मिळवून देण्यासाठी निधीची उणीव पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



शहीद स्मारक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २४ शहिदांचे स्मारक उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे स्मारक होणे ही पहिलीच घटना असावी. स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतर शहिदांच्या बलिदानामुळे देशाची लोकशाही अबाधित राहिली आहे. त्यामुळेच भारत देश एक मजबुत राष्ट्र म्हणून उभा राहिला आहे. हे शहिद स्मारक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.



आमदार आणि पोलिस यांच्यात वाद : देवेंद्र फडणवीस हे अकोल्यातील विविध कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आले होते. दरम्यान, ते येत असल्याने पोलिसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामुळे पोलिस आणि पदाधिकारी यांच्यात चांगलाच वाद झाला. यावेळी याच पक्षाचे नेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी पोलिसांना यासंदर्भात जाब विचारला असता त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. दडपशाही सुरू असल्याचा आरोप यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.

हेही वाचा -

  1. Lok Sabha Elections : शिंदे, फडणवीसांना अजित पवार झाले डोईजड?
  2. Devendra Fadanvis On Sharad Pawar : 'एजन्सीला घाबरून...', देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर जळजळीत टीका
  3. Sanjay Raut on State Government : या सरकारच्या चड्डीच्या नाड्या दिल्लीत म्हणून मुख्यमंत्री नेहमी दिल्लीला जातात; राऊतांची राज्य सरकारवर जळजळीत टीका
Last Updated :Oct 8, 2023, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.