ETV Bharat / state

Shirdi Nagar Panchayat Election 2021 : नगरपंचायतची नगरपरिषद करा, शिर्डी ग्रामस्थांनी टाकला निवडणूकीवर बहिष्कार

author img

By

Published : Dec 20, 2021, 12:45 PM IST

शिर्डी नगरपंचायत कार्यालय
शिर्डी नगरपंचायत कार्यालय

शिर्डी गावचा गावगाडा हा पुर्वी लोकल बोर्डामार्फत चालवला जात होता. गावाचा कारभार पहाण्यासाठी (21 ऑगस्ट 1941) रोजी ग्रामपंचायतची स्थापना करण्यात आली होती. (Shirdi Nagar Panchayat Election 2021) त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रामचंद्र दादा कोते निवडून आले आणि शिर्डी ग्रामपंचायतवर काँग्रेसची सत्ता आली. यंदा मात्र,शिर्डी नगरपंचायतची नगरपरिषद व्हावी यासाठी सर्व पक्षीय ग्रामस्थांनी यंदाच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे.

अहमदनगर (शिर्डी) - इंग्रज कालीन कोर्हाळे तालुक्यातील एक छोटस गाव आहे. या गावचा गावगाडा हा पुर्वी लोकल बोर्डामार्फत चालवला जात होता. गावाचा कारभार पहाण्यासाठी (21 ऑगस्ट 1941) रोजी ग्रामपंचायतची स्थापना करण्यात आली होती. ( Shirdi Nagar Panchayat Municipal Council) त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रामचंद्र दादा कोते निवडून आले आणि शिर्डी ग्रामपंचायतवर काँग्रेसची सत्ता आली.

10 जानेवारी 1990 रोजी शिर्डी नगरपालिकेची स्थापना केली

साईबाबांचा काळात शिर्डीत अनेक भाविकांसह उच्च शिक्षित आणि अधिकाऱ्यांची ये-जा असायची. साईचे महानिर्वाण सन (1918)साली झाले नंतरही शिर्डीत भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु झाली. (elections to form Shirdi Nagar Panchayat ) आतरराष्ट्रीय स्थान प्राप्त झालेल्या शिर्डी गावचा कारभार आणि शिर्डी गावाचे झपाट्याने होणारे शहरीकरण लक्षात घेऊन शासनाने 10 जानेवारी 1990 रोजी शिर्डी नगरपालिकेची स्थापना केली. त्यावेळी गावाची लोक संख्या 16 हजार होती. मात्र, सर्वपक्षीय ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच हवी असा आग्रह धरून निवडणुकांवर वेळोवेळी बहिष्कार घातला. यानंतर तब्बल 9 वर्ष प्रशासक कामकाज पाहत होते. अखेर तडजोड म्हणून शासनाने 21 जून 1999 रोजी नगरपालिका रद्द करून शिर्डीला नगरपंचायत स्थापन केली.

सुरुवातीपासूनच शिर्डी ग्रामपंचायत आणि नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता राहिली

17 डिसेंबर 2001 रोजी नगरपंचायत पहिली निवडणूक लागली. नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून निवड होती. यावेळी काँग्रेसचे कैलास कोते विजयी झाले होते. तसेच, काँग्रेसचे 7, राष्ट्रवादी 1, भाजप 8 आणि शिवसेनेचा 1 नगरसेवक निवडून आले होते. भाजपच्या एका गटाने बंडखोरी करत तत्कालीन काँग्रेसचे शिर्डी विधानसभेचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला मदत करत शिर्डी नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता आली. सुरुवातीपासूनच शिर्डी ग्रामपंचायत आणि नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता राहिली आहे. मात्र, 2014 साली काँग्रेसच्या अनिता जगताप यांनी पक्षांशी बंडखोरी करत भाजप आणि शिवसेनेचा पाठिंबा घेत नगराध्यक्षा झाला होत्या. त्यांचा नगराध्यक्षांचा कार्यकाळ (2014 ते 2016) पर्यंत राहिला त्यानंतर पुन्हा निवडणूक लागली आणि काँग्रेसची सत्ता आली.

काँग्रेस तिकिटावर निवडून आलेले सर्व नगरसेवक भाजपात गेले

सुरवातीपासून विखे पाटील हाच पक्ष आणि त्यांची सत्ता शिर्डी नगरपंचायतवर राहिली आहे. विखे पाटील आता भाजपमध्ये असल्याने 2016 च्या निवडणूकीत काँग्रेस तिकिटावर निवडून आलेले सर्व नगरसेवक भाजपात गेले आहेत. गेल्या 70 ते 80 वर्षापासून शिर्डीत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, आता विखे पाटील भाजपात गेल्याने आता शिर्डी नगरपंचायतची नगरपरीषद होणार असल्याने आगामी निवडणुकीत पुन्हा भाजपची सत्ता येणार का ? हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिर्डीची "लोकसंख्या आणि मतदार"

10 जानेवारी 1990 साली - 1600 हजार गावाची लोकसंख्या होती

2011 च्या जनगणने नुसार शिर्डीची लोकसंख्या 36 हजार आहे

मतदार

  • एकूण मतदार - 30 हजार 800
  • महिला मतदार - 15 हजार 85
  • पुरुष मतदार - 15 हजार 782

    पक्षीय बलाबल -
  • शिर्डी नगरपंचायत 2001 ते 2006
  • भाजप - 8
  • काँग्रेस - 7
  • राष्ट्रवादी काँग्रेस - 1
  • शिवसेना - 1

पक्षीय बलाबल -

  • शिर्डी नगरपंचायत 2006 ते 2011
  • काँग्रेस - 12
  • भाजप - 3
  • अपक्ष - 2

पक्षीय बलाबल -

  • शिर्डी नगरपंचायत 2011 ते 2016
  • काँग्रेस - 11
  • भाजप - 3
  • राष्ट्रवादी काँग्रेस - 2
  • शिवसेना - 1

पक्षीय बलाबल -

  • शिर्डी नगरपंचायत 2016 ते 2021
  • काँग्रेस - 10
  • भाजप - 3
  • शिवसेना - 1
  • मनसे - 1
  • अपक्ष - 2

"निवडणूक या मुद्यांवर झाल्या"

21 जुन 1999 साली शिर्डी नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर प्रथम निवडणूकही शिर्डीतील रस्ते, पाणी अन्य विकास कामांचा मुद्यावर झाली होती. यानंतर आता पर्यंतचा झालेल्या निवडणूक या फक्त एकामेकावर आरोप प्रत्यारोप यावरच झाल्या आहेत. यंदाची 2021 ची निवडणूक ही शिर्डी नगरपंचायत स्वच्छता ठेका आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाचा जमीन वादावरून होणार होती. त्याचबरोबर घरपट्टी, पाणपट्टी कमी करण्याच्या मुद्दावरून आणि शिर्डीत वाढलेले बोगस मतदान यावर निवडणूक झाली असती. मात्र, नगरपंचायतची शिर्डी नगरपरिषद व्हावी यासाठी शिर्डीतील सर्व पक्षीय ग्रामस्थांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला असल्याने निवडणूक होणार नाही. दुसरीकडेकडे शासनानेही नगरपंचायतची नगरपरीषद करण्याची अधिसुचना काढली आहे. त्याची प्रक्रिया पुर्ण होवून नगरपरीषदेची निवडणूक लागेल. नगरपंचायतीच्या निवडणूकीवर बहीष्कार टाकण्यासाठी सर्व पक्षीय एकत्र आले आहेत. मात्र, आता पुन्हा होणाऱ्या निवडणुकीत भाजप विरुध्द महाविकास आघाडी असाच समाना होईल.

हेही वाचा - Ranjitsingh Disle Exclusive Interview : शिक्षक हेच खरे चेंजमेकर्स - रणजीतसिंह डिसले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.