ETV Bharat / state

Shirdi Nagar Panchayat : ग्रामस्थांच्या बहिष्काराला सुरुंग; शिर्डी नगरपंचायत निवडणूक बिनविरोध

author img

By

Published : Jan 19, 2022, 7:19 PM IST

Updated : Jan 19, 2022, 9:58 PM IST

Shirdi Nagar Panchayat
शिर्डी नगरपंचायत निवडणूक बिनविरोध

शिर्डी नगरपंचायत (Shirdi Nagar panchayat) ही नगरपरिषद (Nagar Parishad) व्हावी यासाठी शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी नगरपंचायत निवडणुकीवर (Shirdi Nagar Panchayat Election) बहिष्कार टाकला होता. मात्र, सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या विरोधाला सुरुंग लावत काँग्रेसच्या सहा जणांनी बंडखोरी करत आपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

शिर्डी - नगरपंचायत (Shirdi Nagar panchayat) ही नगरपरिषद (Nagar Parishad) व्हावी यासाठी शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी नगरपंचायत निवडणुकीवर (Shirdi Nagar Panchayat Election) बहिष्कार टाकला होता. मात्र, सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या विरोधाला सुरुंग लावत काँग्रेसच्या सहा जणांनी बंडखोरी करत आपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज शिर्डी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी यांनी या सहा जणांची बिनविरोध निवड जाहीर करत नगरसेवक पदाचे अधिकृत पत्र दिले आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी आपले विरोधक राधाकृष्ण विखे पाटील यांना हा दिलेला धक्का मानला जात आहे.

प्रतिक्रिया देताना नगरपंचायत मुख्यधिकारी आणि विजयी उमेदवार
  • सहा जणांनी भरले होते अपक्ष अर्ज -

शिर्डी नगरपंचायत ही नगरपरिषद व्हावी यासाठी शिर्डीतील सर्व ग्रामस्थ तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. तो बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसून येत असताना काँग्रेसचे शिर्डी शहर उपाध्यक्ष सुरेश काळू आरणे यांनी वार्ड क्रमांक 11 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर त्यांच्या पत्नी अनिता सुरेश आरणे यांनी वार्ड क्रमांक 1 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिर्डी नगरपंचायत ही नगरपरिषद व्हावी यासाठी शिर्डी ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय ग्रामस्थांनी निवडणुकीवर टाकलेल्या बहिष्काराला सर्वात आधी आरणे यांनी दोन जागेवर उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ग्रामस्थांच्या बहिष्काराला सुरुंग लावला होता. त्यानंतर ओबीसी आरक्षणासाठी राखीव असलेल्या चार जागेवर कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे चिन्ह नसताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन उर्फ संभाजी चौगुले यांनी वार्ड क्रमांक 14 मधून तर त्यांच्या पत्नी आरती संभाजी चौगुले यांनी वार्ड क्रमांक 10 मधून अपक्ष तर अर्चना अमृत गायके यांनी वार्ड क्रमांक 5 तर प्रसाद प्रकाश शेळके यांनी वार्ड क्रमांक 8 मधून या काँग्रेस उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत खळबळ उडवून दिली होती.

  • सहा जण बिनविरोध -

आता हे सहा जण बिनविरोध नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज निवडणूक अधिकारी म्हणून शिर्डी नगरपंचायतचे मुख्यधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी आज या सहा जणांना नगरसेवक पदाचे अधिकृत पत्र दिले आहे. शिर्डी नगरपंचायतच्या इतिहासात प्रथमच तब्बल सहा नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली असल्याने या घटनेला एक विशेष महत्त्व आले आहे.

शिर्डीच्या नगरपंचायत ही नगरपरिषद होणारच असल्याने शिर्डीतील ग्रामस्थांनी आणि सर्वपक्षीयांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. तरीही कॉग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक प्रकारे ग्रामस्थांशी बंड करत आपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. लोकशाही प्रक्रियेद्वारेच आम्ही निवडणूक लढवली आहे. शिर्डीची नगरपरिषद होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे विजयी उमेदवार व कॉग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चौगुलेंनी सांगितले आहे.

  • बिनविरोध निवड झालेले उमेदवार -

आरती संभाजी चौगुले - अपक्ष, वार्ड नं 10

अर्चना अमृत गायके - अपक्ष, वार्ड नं 05

अनिता सुरेश आरने - अपक्ष, वार्ड नं 01

प्रसाद प्रकाश शेळके - अपक्ष, वार्ड नं 08

सचिन उर्फ संभाजी नानासाहेब चौगुले - अपक्ष, वार्ड नं 14

सुरेश काळू आरने - अपक्ष, वार्ड नं 11

Last Updated :Jan 19, 2022, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.