ETV Bharat / state

महागाई विरोधात 'दुचाकीला दे धक्का आंदोलन' करून शिर्डीत काँग्रेसने नोंदवला मोदी सरकारचा निषेध

author img

By

Published : Oct 11, 2021, 7:21 AM IST

देशात सध्या दारु स्वस्त, मात्र पेट्रोल आणि खाद्य तेल महाग झाले आहे. त्यामुळे या वाढत्या महागाईत सर्वसामान्य माणूस भरडून गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यात जनजागृती करण्यासाठी आणि आगामी निवडणुकात भाजपला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आजच आंदोलन करण्यात आल आहे.

दुचाकीला दे धक्का आंदोलन'
दुचाकीला दे धक्का आंदोलन'

शिर्डी - केंद्र देशात दिवसेंदिवस महागाईचा भडका वाढतच आहे. इंधनाचे दर सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीर काँग्रेस कार्यकर्त्यांनी महागाई विरोधात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढली असल्याचा आरोप करत रविवारी शिर्डी शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल ढकलुन वाढत्या महागाईचा निषेध केला आहे. शिर्डी नगरपंचायती पासून ते साई मंदिराच्या पाच नंबरच्या प्रवेश द्वारापर्यंत मोटरसायकल ढकलून जोरदार घोषणाबाजी केली.

'दुचाकीला दे धक्का आंदोलन'


देशात सध्या दारु स्वस्त, मात्र पेट्रोल आणि खाद्य तेल महाग झाले आहे. त्यामुळे या वाढत्या महागाईत सर्वसामान्य माणूस भरडून गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यात जनजागृती करण्यासाठी आणि आगामी निवडणुकात भाजपला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आजच आंदोलन करण्यात आल आहे.

केंद्र सरकारच्या नवीन तीन कृषी कायद्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यांना दिलासा देण्याएैवजी भाजपाच्या मंत्र्यांच्या मुलाने त्या आंदोलक शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले. त्या घटनेचाही यावेळी निषेध करण्यात आला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी सुरेश थोरात साईबाबा संस्थान विश्वस्त डॉक्टर एकनाथ गोंदकर, सुभाषराव निर्मळ,दिलीप कोते,सुरेश आरने, आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दुचाकीला दे धक्का आंदोलन'
दुचाकीला दे धक्का आंदोलन'

हेही वाचा - साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू, पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

हेही वाचा - महाराष्ट्रात आज राज्यव्यापी बंद, अत्यावश्यक सेवा वगळता 'हे' राहणार बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.