ETV Bharat / state

सामान्य भक्ताप्रमाणे मंदिर परिसरात बाहेर बसून खासदार शिंदेंनी लावली साई आरतीस हजेरी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 10:19 PM IST

MP Shrikant Shinde
श्रीकांत शिंदे

MP Shrikant Shinde: खासदार श्रीकांत शिंदे यांना साई मंदिरातील संध्याकाळच्या धूप आरतीकरिता पोहचण्यासाठी (Shrikant Shinde in Shirdi) उशीर झाल्याने सर्व सामान्य भक्ताप्रमाणे मंदिर परिसरात बाहेर बसून त्यांनी आरतीस हजेरी लावली. (Sai Mandir Shirdi) आरती संपल्यानंतर त्यांनी साई मंदिरात जाऊन साई समाधीचे दर्शनही घेतले.

साई बाबा दर्शनानंतर श्रीकांत शिंदे राजकीय प्रतिक्रिया देताना

शिर्डी (अहमदनगर) MP Shrikant Shinde: आम्हाला व्हीआयपी कल्चर नाही. आम्ही गरिबीतून सगळं पाहिलं आहे. (Shrikant Shinde Saidarshan) त्यामुळे व्हीआयपी कक्षापेक्षा बाबांच्या मंदिरात बाहेर बसून जर आरती केली तर मनशांती मिळत असते. एक वेगळा अनुभव मिळाल्याची भावना खासदार शिंदे यांनी व्यक्त केली. (Jitendra Awhad)


आव्हाडांनी हिन्दुत्व शिकवण्याची गरज नाही: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांना वादग्रस्त वक्तव्य करण्याची सवय आहे. राजकारण इतक्या खालच्या स्तराला जाईल, असं वाटलं नव्हतं. हिंदूंच्या देवतांवर टीका नाही केली तर आव्हाडांचं राजकारण चालणार नाही. ते जिथून निवडून येतात तेथे त्यांना अशा टीका कराव्या लागतात; पण प्रभु श्रीरामांबद्दल आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. अशा मनो विकृतीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आव्हाडांनी कोणाला हिन्दुत्व आणि श्रीराम शिकविण्याची गरज नाही. त्यांना एवढीच आवड असेल तर त्यांनी औरंगजेब, खिलजी, अफजलखान कोण आहेत हे त्यांनी ते ज्या मुंब्रा मतदार संघातून निवडून येतात तेथे जाऊन गप्पा मारल्या पाहिजेत. लोकांना प्रबोधन केलं पाहिजे, असा सल्ला खासदार श्रीकांत शिंदे यांनी आव्हाडांना दिलाय.

वातावरण कलंकित करण्याचा प्रयत्न: आमच्या हिंदू देवतांवर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांनी पातळी सोडलेली आहे. ते हँबीज्युयल झाल्यासारखे वागतात. आव्हाडांच्या नेत्यांना विचारायला हवयं आव्हाड जे म्हणाले ते तुम्हाला पटतयं का ? उबाठाच्या नेत्यांनाही जाऊन विचारायला हवयं की तुमच्या बरोबर असलेल्या सहकार्यानं प्रभु रामाबद्दल केलेलं वक्तव्य तुम्हाला पटतयं का? आज देशात चांगल वातावरण असताना त्याला कलंकित करण्याचं काम काही लोकांनी सुरू केलं आहे. त्यांच्या बरोबर जे जे आहेत त्यांना जाऊन प्रश्न विचारला पाहिजे. आता पर्यंत जे जे निर्णय लागले आहेत ते ते खऱ्या शिवसेनेच्या बाजूने लागले आहेत. या पुढचे निर्णयही जे सत्य आहे सत्याच्या बाजूनेच लागतील, असा विश्वासही खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिर्डीत साई दर्शनानंतर बोलताना व्यक्त केलाय.

उपमुख्यमंत्र्यांकडून साई समाधीचे दर्शन: आंध्र प्रदेशचे उपमुख्‍यमंत्री कोट्टू सत्‍यनारायण यांनी आज सहपरिवार शिर्डीत येऊन साईबाबांच्या मंदिरात जाऊन साई समाधीचे दर्शन घेतले आहे. साईबाबांच्या आरतीनंतर कोट्टू सत्‍यनारायण यांनी सहपरिवार साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. साई दर्शनानंतर त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने शॉल, साईमूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर त्यांनी श्री साई प्रसादालयात जाऊन साईबाबांच्या प्रसादाचा लाभ घेतलाय. पुढे ते सहपरिवार शिर्डी विमानतळाकडे रवाना झाले.

हेही वाचा:

  1. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गँगवॉरनं पुन्हा काढलं डोकं वर; 'हे' आहेत कारणं
  2. 'गुंड कोणताही असो, त्याचा बंदोबस्त लावण्याचं काम'; शरद मोहोळ प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
  3. "राम मांसाहारी होता" वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड अडचणीत, राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.