ETV Bharat / state

पुण्यात गँगवॉर नाही, गुंड कोणताही असो, योग्य बंदोबस्त करणार; शरद मोहोळ प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 8:08 PM IST

Updated : Jan 5, 2024, 9:46 PM IST

Devendra Fadnavis : पुण्यातील गुंड शरद मोहोळची हत्या त्याच्याच साथीदारानं केली. हे कोणतंही गॅंग वॉर नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच जितेंद्र आव्हाड यांचं श्री रामाविषयीचं वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचा हल्लाबोल फडणवीसांनी केलाय.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

पुणे Devendra Fadnavis : पुण्यात शुक्रवारी (5 जानेवारी) भरदिवसा झालेल्या गॅंगस्टर शरद मोहोळच्या हत्येवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "हे कोणतंही गँग वॉर नाही. शरद मोहोळची हत्या त्याच्याच साथीदारानं केली. गुंड कोणताही असो, त्याचा बंदोबस्त लावण्याचं काम हे सरकार करतं. त्यामुळं गँग वॉर करण्याची हिंमत कोणताही गुंड करणार नाही", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रोहित पवारांवर टीका : रोहित पवारांवर ईडीनं केलेल्या कारवाईला भाजपाच्या सुडाच्या राजकारणाची जोडणं म्हणजे विनाकारण शहीद होण्याचे प्रयत्न आहेत, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला. "रोहित पवार बिजनेस करतात. यामध्ये अशा गोष्टी होत असतात. जर त्यांनी सगळं नीट केलं असेल तर त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही. या प्रकरणाला राजकारणाशी जोडू नका", असं फडणवीस म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य मूर्खपणाचं : "जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामा विषयी केलेलं वक्तव्य मूर्खपणाचं आणि केवळ प्रसिद्धीसाठीच आहे. 'बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ' अशी म्हण हिंदीत प्रचलित आहे. जितेंद्र आव्हाड नेहमी प्रसिद्धी मिळवण्याकरता करता असं करत असतात. हा एक त्यांचा स्वभाव आहे. प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहेत. ते बहुजनांचे, अभिजनांचे, दलितांचे आणि आदिवासींचेही आहेत. असं असतानाही ते शाकाहारी, मांसाहारी असं वक्तव्य करून जितेंद्र आव्हाडांनी विनाकारण लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवण्याचं काम केलं", असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

आव्हाडांच्या वक्तव्यामुळे वारकऱ्यांचा अपमान : आमचे वारकरी, माळकरी बहुजन समाजातले आहेत. हे प्रभू श्रीरामांना मानतात. ते सगळे शाकाहारी आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे या सर्वांचा अपमान झालाय. त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण विवाद उभा करणं, लोकांच्या भावना दुखावणं आणि अशांतता तयार होईल असं वागणं, हे अत्यंत चुकीचं असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं.

हे वाचलंत का :

  1. गँगस्टर शरद मोहोळचा दिवसाढवळ्या गेम; लग्नाच्या वाढदिवसालाच भयावह शेवट
  2. "राम मांसाहारी होता" वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड अडचणीत, राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल
  3. रोहित पवारांच्या अडचणी वाढल्या, बारामती ॲग्रोवर ईडीची छापेमारी
Last Updated :Jan 5, 2024, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.