ETV Bharat / state

राज्य कृषी आयुक्तांनी केली संगमनेर तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी

author img

By

Published : Nov 4, 2019, 10:36 AM IST

कृषी आयुक्त सुहास दिवसे

परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, कांदा, मका, डाळिंब, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी राज्याचे कृषी आयुक्त सुहास आले होते. यावेळी त्यांनी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खंदरमाळवाडी, बोरबन, बोटा येथील पिकांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

अहमदनगर - राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पीक नुकसानीची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहेच मात्र, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन सर्वतोपरी मदत करणारच आहे. शेतकऱ्यांनी विमा भरलेला असेल तर त्यांना त्याप्रमाणे मदत दिली जाईल. तसेच जर विमा उतरवलेला नसेल तर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत त्या शेतकऱयांना मदत दिली जाईल असे दिवसे यांनी सांगितले.

कृषी आयुक्त सुहास दिवसे

राज्यात अतिवृष्टीमुळे ६० लाख हेक्टरवर शेतातील पीके जमीनदोस्त झाली असून जिल्हा प्रशासनाकडून पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. संगमनेर तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, कांदा, मका, डाळिंब, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी राज्याचे कृषी आयुक्त सुहास आले होते. यावेळी त्यांनी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खंदरमाळवाडी, बोरबन, बोटा येथील पिकांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पाण्यात भिजलेली बाजरी, कांदा, ज्वारी, मका पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा त्याच्या समोर मांडल्या. तसेच शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत विमा योजनेचा लाभ मिळण्याची मागणी केली असल्याचे ते म्हणाले. यावेळी पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे पंचनाम्यात दिसून आले.

हेही वाचा - रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता शोधण्यासाठी 'आप'चे स्पायडरमॅन आंदोलन
शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिवसे म्हणाले, पावसाचे काही खरे नाही, तो कधीही पडत आहे. त्यामुळे शेतकऱयांनी कांदा पिकाचाही विमा काढणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून शेतकऱयांना नुकसान भरपाईचे चांगले पैसे मिळतात. दरम्यान त्यांनी डाळिंब बागांचीही पाहणी केली. शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले असून महसूल अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक पिकांचे पंचनामे करावेत, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत पुणे विभागीय कृषी सह संचालक दिलीप झेंडे, उपविभागीय कृषी आधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, खंदरमाळवाडी गावचे उपसरपंच प्रमोद लेंडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके आदि उपस्थित होते.

हेही वाचा - शरद पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच - विजय वडेट्टीवार

Intro:



Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पिक नुकसानीची पाहणी केली..शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शासन सर्वतोपरी मदत करणारच आहे. शेतकऱ्यांनी विमा भरलेला असेल तर त्यांना त्या प्रमाणे मदत दिली जाईल आणि जरी विमा उतरवलेला नसेल तरी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत त्या शेतकर्यांना मदत दिली जाईल अस राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितलय....


VO_राज्यात अतिवृष्टीमुळे साठ लाख हेक्टरवर शेतातील पिके जमीनदोस्त झाली असून जिल्हा प्रशासनाकडून पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत..संगमनेर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, सेंद्रीकदा, मका, डाळिंब, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी आज राज्याचे कृषी आयुक्त सुहास यांनी केलीये संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खंदरमाळवाडी, बोरबन, बोटा येथील पिकांची बंदावर जाऊन पाहणी केली.दरम्यान पाण्यात भिजलेली बाजरी, कांदा, ज्वारी, मका पाहणी करून कृषी आयुक्त दिवसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा त्याच्या समोर मांडल्या. तसेच तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत विमा योजनेचा लाभ मागणी केली आहे. यावेळी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे पंचनाम्यात दिसून आले....शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषी आयुक्त दिवसे म्हणाले, पावसाचे काही खरे नाही कधीही पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी कांदा पिकाचाही विमा काढणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून शेतकर्यांना नुकसान भरपाईचे चांगले पैसे मिळतात. यावेळी डाळिंब बागांचीही पाहणी केली. शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले असून महसूल अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक पिकांचे पंचनामे करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या...यावेळी त्यांच्या समवेत पुणे विभागीय कृषी सह संचालक दिलीप झेंडे, उपविभागीय कृषी आधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, खंदरमाळवाडी गावचे उपसरपंच प्रमोद लेंडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके....Body:mh_ahm_shirdi_farmer vaist_3_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_farmer vaist_3_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.