ETV Bharat / sports

टेनिसपटू निक किरगिओसची एटीपीवर टीका, म्हणाला....

author img

By

Published : Jun 12, 2020, 6:04 PM IST

Nick kyrgios called atp selfish for organizing us open
टेनिसपटू निक किरगिओसची एटीपीवर टीका, म्हणाला....

किरगिओस म्हणाला, "एटीपी यूएस ओपन आयोजित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा स्वार्थीपणा आहे. मला वाटते की टेनिसच्या पुनरागमनापूर्वी आपल्याला कोरोना आणि दंगलींशी एकत्र लढण्याची गरज आहे."

न्यूयॉर्क - ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू निक किरगिओसने यूएस ओपनच्या आयोजनाबाबत एटीपीवर टीका केली आहे. इतकेच नव्हे तर, किरगिओसने एटीपीचे स्वार्थी म्हणून वर्णन केले.

किरगिओस म्हणाला, "एटीपी यूएस ओपन आयोजित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा स्वार्थीपणा आहे. मला वाटते की टेनिसच्या पुनरागमनापूर्वी आपल्याला कोरोना आणि दंगलींशी एकत्र लढण्याची गरज आहे."

  • The ATP is trying to make the US Open go ahead. Selfish with everything going on at the moment. Obviously Covid, but also with the riots, together we need to overcome these challenges before tennis returns in my opinion. https://t.co/tEHPvr4miB

    — Nicholas Kyrgios (@NickKyrgios) June 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा 24 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा आपल्याला वेळेत आयोजित करायची असल्याचे एटीपी आणि अमेरिका टेनिस असोसिएशनच्या (यूएसटीए) संयोजकांनी सांगितले आहे.

अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि स्पेनचे राफेल नदाल यांनी या स्पर्धेत खेळण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी तयार केलेले नियम कडक असल्याचे मत जोकोविचने दिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.