ETV Bharat / sports

पोर्तुगाल ग्रँड प्रिक्सच्या सराव सत्रात वाल्टेरी बोटास अव्वल

author img

By

Published : Oct 24, 2020, 3:37 PM IST

पोर्तुगाल ग्रँड प्रिक्सच्या पहिल्या सराव सत्रात मर्सिडीजचा ड्रायव्हर वाल्टेरी बोटासने पहिले स्थान मिळवले. तर, रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने तिसरे स्थान राखले.

valtteri bottas topped the first practice session of portugal grand prix
पोर्तुगाल ग्रँड प्रिक्सच्या सराव सत्रात वाल्टेरी बोटास अव्वल

लिस्बन - मर्सिडीजचा ड्रायव्हर वाल्टेरी बोटासने पोर्तुगाल ग्रँड प्रिक्सच्या पहिल्या सराव सत्रात वेगवान वेळ नोंदवत प्रथम स्थान मिळवले. बोटास त्याचा सहकारी ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनपेक्षा ०.३४ सेकंद पुढे होता. रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने तिसरे स्थान राखले.

  • Valtteri Bottas set the pace ahead of Lewis Hamilton on Formula 1's debut at the 'rollercoaster' Portimao circuit, with Mercedes stealing an early march on Red Bull in #PortugueseGP Practice One.

    FP1 Report ✍️📲⤵️#SkyF1 | #F1

    — Sky Sports F1 (@SkySportsF1) October 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हॅमिल्टनने चॅम्पियनशिप टेबलमध्ये आघाडी घेतली आहे. दोन आठवड्यांपूर्वी जर्मनीच्या आयफेल ग्रँड प्रिक्स येथे त्याने मायकेल शुमाकरच्या ९१ विजयाच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

तत्पूर्वी, बोटासने रविवारी रशिया ग्रँड प्रिक्स शर्यत जिंकली. यंदाच्या वर्षातील बोटासचे हे दुसरे विजेतेपद आहे. बोटासचा सहकारी लुईस हॅमिल्टनला दहा-सेकंदाच्या पेनल्टीमुळे तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.