Australian Open : नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमधून सकारात्मक संदेशाची अपेक्षा

author img

By

Published : Sep 23, 2022, 7:35 PM IST

Novak Djokovic

लसीकरण न केल्यामुळे नोव्हाक जोकोविच ( Unvaccinated Novak Djokovic ) ऑस्ट्रेलियन ओपन या वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेला मुकला होता.

लंडन: कोविड-19 विरुद्ध लसीकरण न केल्यामुळे या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनला ( Australian Open ) मुकलेल्या नोव्हाक जोकोविचला, पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी आयोजकांकडून सकारात्मक संदेशाची अपेक्षा आहे. लसीकरण न केल्यामुळे जोकोविचला ( Novak Djokovic ) वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत खेळता येईल की नाही याबाबत ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांकडून अद्याप कोणताही संदेश मिळालेला नाही.

"हे खरोखर माझ्या हातात नाही," जोकोविच गुरुवारी लेव्हर कप ( Laver Cup ) दरम्यान म्हणाला. त्यामुळे मला सकारात्मक बातमीची अपेक्षा आहे. जोकोविचच्या नावावर एकूण 21 ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद आहे. तसेच तो फक्त राफेल नदालच्या 22 विजेतेपदांच्या मागे आहे. त्याने विक्रमी नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.

परंतु या वर्षी जानेवारीमध्ये, त्याला 10 दिवसांच्या कायदेशीर लढाईनंतर ऑस्ट्रेलियातून हद्दपार करण्यात आले होते. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण न केल्यामुळे त्याचा ( Unvaccinated Novak Djokovic ) व्हिसा रद्द करण्यात आला. टेनिस ऑस्ट्रेलियाने याआधी त्याला सूट दिली होती, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियात पोहोचला होता. ऑस्ट्रेलियाने जुलैपासून आपले कठोर सीमा नियमांमध्ये बदल केला.

जुलैनंतर ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या लोकांना कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा पुरावा किंवा कोविड-19 साठी नकारात्मक चाचणी अहवाल सादर करण्याची गरज नाही. लसीकरण न केल्यामुळे जोकोविच यंदा यूएस ओपनमध्येही खेळू शकला नव्हता.

हेही वाचा - Pak Vs Eng 2nd T20 : बाबर रिझवानच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानचा इंग्लंडवर 10 विकेट्सने विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.