ETV Bharat / sports

Tokyo Olympics : भारतीय बॉक्सर लवलिना बोर्गोहेन पदकापासून एक पाऊल दूर

author img

By

Published : Jul 27, 2021, 12:37 PM IST

Updated : Jul 27, 2021, 1:28 PM IST

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरूष बॉक्सरांनी निराश केलं. परंतु, महिला बॉक्सरांनी विजयी प्रारंभ केला. मेरी कोम नंतर आता लवलिना बोर्गोहेन याने पहिला सामना जिंकला आहे.

tokyo-olympics-boxer-lovlina-borgohain-reaches-quarterfinals-by-beating-nadine-aptez-in-womens-welter-69kg-round-of-16
Tokyo Olympics : भारतीय बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन पदकापासून दोन पाऊल दूर

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरूष बॉक्सरांनी निराश केलं. परंतु, महिला बॉक्सरांनी विजयी प्रारंभ केला. मेरी कोमनंतर आता लवलिना बोर्गोहेन याने पहिला सामना जिंकला आहे. लवलिनाने राउंड ऑफ 16 च्या सामन्यात जर्मनीच्या नेदिन अपेत्झचा 3-2 ने पराभव केला. विशेष म्हणजे लवलिनाने अनुभवी अपेत्झचा पराभव करत ऑलिम्पिकमध्ये सुरूवात केली.

उपांत्यपूर्व फेरीत लवलिनाचा सामना चीनी खेळाडूशी -

उपांत्यपूर्व फेरीत भारतीय लवलिनाचा सामना चीनच्या चेन नेन हिच्याशी होणार आहे. चीनच्या खेळाडूने राउंड ऑफ 16 च्या फेरीत इटलीच्या खेळाडूचा बॉक्सरचा पराभव केलेला आहे. दरम्यान, 2018 च्या जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चेनने लवलिनाला पराभूत केलं होतं. या पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी भारतीय लवलिनाकडे आहे.

लवलिना पदकापासून एक विजय दूर

लवलिना अंतिम 8 मध्ये पोहोचली आहे. तिला पदक जिंकण्यासाठी आणखी एक सामना जिंकावा लागणार आहेत. पण यासाठी काही गणिते जुळून यावी लागतील.

कोण आहे लवलिना -

लवलिना बोर्गोहेन ही 24 वर्षाची असून ती आसामची राहिवाशी आहे. सरुपथर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या 2 हजार लोकांची वस्ती असलेल्या बरोमुखिया गावात लव्हलिना राहते. तिने दोन वेळा जागतिक चॅम्पियनशीपमध्ये पदक जिंकलं आहे. ऑलिम्पिकसाठी ती पहिल्याच पात्र ठरली आहे. ती 69 किलो ग्राम वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

ऑलिम्पिक बॉक्सिंग इव्हेंटमध्ये भारतीय बॉक्सरकडून खूप आशा होत्या. परंतु पुरुष बॉक्सरनी सुमार कामगिरी केली. आता महिला बॉक्सरकडून देशाला पदकाच्या आशा आहेत. मेरी कोम नंतर आता लवलिनाकडून देखील पदकाची आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - Tokyo Olympics : सबसे बूढ़ा हू..! 58व्या वर्षी 'या' अॅथलिटकने जिंकलं ऑलिम्पिक पदक

हेही वाचा - VIDEO : चिमुकलीच्या वेटलिफ्टिंगची देशवासियांना भूरळ; मीराबाई चानूची देखील क्यूट प्रतिक्रिया

Last Updated :Jul 27, 2021, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.