ETV Bharat / sports

Sania Mirza withdrew from US Open यूएस ओपनमधून सानिया मिर्झाची माघार, निवृत्तीचा प्लॅन देखील बदलणार

author img

By

Published : Aug 23, 2022, 6:59 PM IST

Sania Mirza
सानिया मिर्झा

सानियाला दोन आठवड्यांपूर्वी कॅनडात दुखापत Sania Mirza injured in Canada झाली होती. त्यानंतर तिने मंगळवारी सकाळी एका सोशल पोस्टमध्ये वर्षातील शेवटच्या ग्रँडस्लॅममधून माघार घेतल्याची घोषणा केली.

हैदराबाद भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने Star tennis player Sania Mirza दुखापतीमुळे आगामी यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. तिच्या कोपराला दुखापत झाली आहे. मंगळवारी सकाळी एका सोशल पोस्टमध्ये सानियाने वर्षातील शेवटच्या ग्रँड स्लॅममधून माघार घेतल्याची घोषणा Sania Mirza withdrew from US Open केली.

सानियाने सांगितले की, दोन आठवड्यांपूर्वी तिला कॅनडामध्ये दुखापत Sania Mirza injured in Canada झाली होती, पण तेव्हा ती किती गंभीर होती, हे तिला समजले नाही. जेव्हा तिचे स्कॅन केले तेव्हा असे आढळून आले की तिच्या कोपराला गंभीर दुखापत झाली आहे आणि तिला बरे होण्यासाठी काही आठवडे लागतील. यानंतर, तिने यूएस ओपनमधून आपले नाव मागे घेतले आणि सांगितले की या दुखापतीमुळे निवृत्तीची योजना बदलेल Sania retirement plan will change. 35 वर्षीय सानिया मिर्झाने तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिले की, मी काही आठवडे बाहेर राहीन आणि यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. हे योग्य नाही आणि चुकीच्या वेळी आहे, यामुळे माझी सेवानिवृत्ती योजना देखील बदलेल. मी पुढे तुम्हाला सांगत राहीन.

सहा वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन सानिया मिर्झासाठी 2022 हे विशेष वर्ष राहिले नाही. ऑस्ट्रेलियन ओपनपासून ते विम्बल्डन आणि फ्रेंच ओपनपर्यंत तिची कामगिरी काही विशेष झाली नाही. यूएस ओपनमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर सानिया टेनिसमधून निवृत्ती घेईल, अशी अपेक्षा होती, पण या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर तिचे चाहते निराश झाले आहेत. सानिया मिर्झा महिला दुहेरीत नंबर-1 राहिली आहे. सानियाने कारकिर्दीत सहा जेतेपद पटकावले आहेत. यामध्ये तीन महिला दुहेरी आणि तीन मिश्र दुहेरी विजेतेपदांचा समावेश आहे.

हेही वाचा - BWF World Championship सायना नेहवाल प्री-क्वार्टर फायनलमध्ये दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.