ETV Bharat / sports

Womens T20 Wc Winners Team : विश्वचषक स्पर्धेत 5 वेळा चॅम्पियन ठरलेल्या टीमबरोबर भारताची लढत; पाहा 2009 ते 2020 पर्यंतचे सामन्यांचे आकडे

author img

By

Published : Feb 22, 2023, 2:15 PM IST

दक्षिण आफ्रिकेत महिला T20 विश्वचषक स्पर्धेचा उपांत्य सामना गुरुवारी, 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा सामना 5 वेळा T20 वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा सेमीफायनल खेळणार आहे. 2009 ते 2020 या कालावधीत ऑस्ट्रेलियाने 7 पैकी 5 हंगाम जिंकले आहेत.

Womens T20 WC Winners Team
विश्वचषक स्पर्धेत 5 वेळा चॅम्पियन ठरलेल्या टीमबरोबर भारताची लढत

नवी दिल्ली : महिला टी-20 विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 8 व्या हंगामात भारतीय संघाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण भारताने आतापर्यंत एकदाही विश्वचषक स्पर्धा जिंकली नाही. भारताला ही मोठी संधी असणार आहे विश्वचषक जिंकण्याची. परंतु, भारताची लढत एका बलाढ्य संघाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने 5 वेळा विश्वचषक जिंकला आहे, त्यामुळे भारताला त्यांना हरवणे नक्कीच सोपे नसणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.

सेमिफायनल अपडेट : गुरुवार, 23 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6.30 वाजता केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 2009 ते 2020 पर्यंत कोणत्या संघाने सर्वाधिक स्पर्धा जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त, 7 व्या हंगामापर्यंत, महिला T20 विश्वचषक चॅम्पियन इंग्लंड आणि वेस्ट इंडिज प्रत्येकी एकदा जिंकला आहे. सर्वात जास्त ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक वेळा विश्वचषक जिंकून आपले जगज्जेतेपद कायम ठेवले आहे. त्यामुळे या बलाढ्य संघाबरोबर लढणे कोणत्याही संघाला सोपे नसणार आहे.

Womens T20 WC Winners Team
विश्वचषक स्पर्धेत 5 वेळा चॅम्पियन ठरलेल्या टीमबरोबर भारताची लढत; पाहा 2009 ते 2020 पर्यंतचे सामन्यांचे आकडे

टीम इंडियाची कामगिरी : महिला T20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने आपल्या ग्रुप-2 मधील 4 पैकी 3 सामने जिंकून उपांत्य फेरी गाठण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि आयर्लंडला ३ सामन्यांत पराभूत करून भारतीय संघ येथपर्यंत पोहोचला आहे. आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत आम्हाला ऑस्ट्रेलियाबरोबर सामना करायचा आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या ग्रुप-1 मधील सर्व 4 सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. महिला T20 विश्वचषक 2009 मध्ये सुरू झाला, ज्यामध्ये अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून इंग्लंड चॅम्पियन बनला. 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 मध्ये ही स्पर्धा जिंकून ऑस्ट्रेलियन संघ पाच वेळा T20 विश्वचषकाचा चॅम्पियन बनला आहे.

भारतीय संघ यजमान असताना : भारताने 2016 मध्ये महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते, ज्याचा अंतिम सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला. यामध्ये वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला हरवून पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर टीम इंडियाला एकदाही हे विजेतेपद मिळवता आलेले नाही. पण, 2020 मध्ये भारतीय संघ या स्पर्धेत उपविजेता ठरला. त्यामुळे आता तिसऱ्यांदा टीम इंडिया उपांत्य फेरीत खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

इंग्लडचा पाकिस्तानवर विजय : आयसीसी महिला विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंडने मंगळवारी त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानवर ११४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गट दोनमधील आपले अव्वल स्थान कायम राखले. इंग्लंडचा हा विजय म्हणजे ब गटात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भारतीय संघाला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाचे आव्हान पेलावे लागणार आहे. गट 'ब'मध्ये इंग्लंडने चारपैकी चार सामने जिंकू आठ गुण प्राप्त केले आहेत. उपांत्य फेरीत त्यांची लढत गट 'अ' मधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होईल.

हेही वाचा : ICC Women T20 World Cup 2023 : इंग्लडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; सेमीफायनलचे संघ जाहीर, भारताची होणार 'या' टीमशी लढत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.