ETV Bharat / sports

Hockey World Cup 2023 : भारताची विजयी सुरुवात, स्पेनचा 2-0 ने केला पराभव

author img

By

Published : Jan 13, 2023, 10:37 PM IST

India beat Spain
भारताने स्पेनचा पराभव केला

हॉकी विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताने स्पेनचा 2-0 असा पराभव केला. भारतासाठी पहिला गोल अमित रोहिदासने केला. तर हार्दिक सिंगने टीम इंडियासाठी दुसरा गोल केला.

राउरकेला (ओडीशा) : 15 व्या हॉकी विश्वचषकाला आज ओडिशातील राउरकेला येथे सुरुवात झाली. भारताचा पहिला सामना स्पेनविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने स्पेनचा 2-0 असा पराभव केला. भारताकडून अमित रोहिदास आणि हार्दिक सिंगने गोल केले. या विजयासह टीम इंडियाने पूल डी मध्ये दुसरे स्थान मिळवले. इंग्लंडने यापूर्वी वेल्सचा 5-0 असा पराभव केला होता. चांगल्या गोल फरकामुळे ते पहिल्या स्थानावर आहेत.

भारतासाठी पहिला गोल अमित रोहिदासने केला. 12व्या मिनिटाला टीम इंडियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यावर अमित रोहिदासने शानदार गोल केला. हार्दिक सिंगने टीम इंडियासाठी दुसरा गोल केला. त्याने 26व्या मिनिटाला हा गोल केला.

भारत विरुद्ध स्पेन शेवटचे ५ सामने :

  • भारत 2-2 स्पेन
  • भारत 2-3 स्पेन
  • भारत 3-5 स्पेन
  • भारत 5-4 स्पेन
  • भारत 3-0 स्पेन

भारत विरुद्ध स्पेन हेड टू हेड :

एकूण सामने : ३१

भारत जिंकला : १३

स्पेन जिंकला: 11

ड्रॉ : ७

एकूण 16 देश सहभागी : हॉकीच्या या महासंग्रामात जगातील 16 देश जगज्जेते होण्यासाठी धडपडणार आहेत. विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अ गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, अर्जेंटिना, ब गटात बेल्जियम, जपान, कोरिया, जर्मनी, क गटात नेदरलँड, चिली, मलेशिया, न्यूझीलंड आणि ड गटात भारत, वेल्स, स्पेन, इंग्लंड हे संघ आहेत.

भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा : 2021 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाकडून यावेळी विश्वचषकात चांगली कामगिरी अपेक्षित आहे. भारताचा पहिला सामना 13 जानेवारीला स्पेन, 15 जानेवारीला इंग्लंड आणि 19 जानेवारीला वेल्सशी होणार आहे. 17 दिवस चालणाऱ्या या हॉकीच्या महाकुंभात 44 सामने होणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये 24 सामने होणार आहेत.

हेही वाचा : Hockey World Cup 2023 : भारताचा पहिला सामना स्पेन विरुद्ध, दिग्गज खेळाडूंनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.