ETV Bharat / sports

विशेष मुलाखत: दोन्ही हातांनी अपंग 'सुयश'ची स्विमिंगमध्ये सुवर्णपदकापर्यंत मजल... वाचा प्रेरणादायी कहाणी

author img

By

Published : Aug 11, 2020, 9:30 PM IST

सुयश जाधव
सुयश जाधव

वयाच्या १३ व्या वर्षी एका अपघातात आपले दोन्ही हात गमावणाऱ्या सुयशने जिद्द सोडली नाही. दोन्ही हात अपघातात गमावूनही त्याने पोहण्याचा सराव केला. २०१८ साली आशियायी अपंगाच्या जलतरण स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले. तर २०१६ साली झालेल्या जर्मनीतील स्पर्धेत त्याने दोन कांस्य आणि एक रौप्य पदक मिळवले. त्याचा हा प्रवास सर्वांना प्ररणा देणारा आहे.

हैदराबाद - पॅराऑलंपिकपटू सुयश जाधवने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे. वयाच्या १३ व्या वर्षी एका अपघातात आपले दोन्ही हात गमावणाऱ्या सुयशने जिद्द सोडली नाही. दोन्ही हात अपघातात गमावूनही त्याने पोहण्याचा सराव केला. २०१८ साली आशियायी अपंगाच्या जलतरण स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले. तर २०१६ साली झालेल्या जर्मनीतील स्पर्धेत त्याने दोन कांस्य आणि एक रौप्य पदक मिळवले. त्याचा हा प्रवास सर्वांना प्ररणा देणारा आहे. ईटीव्ही भारतने सुशय जाधवची खास मुलाखत घेतली आहे. त्याचा हा वृत्तांत...

अपंग असूनही स्विमिंगमध्ये सुवर्णपदकापर्यंत मजल...सुयश जाधवची प्रेरणादायी कहानी

प्रश्न: एशियन पॅरा स्पर्धांमध्ये पहिलेवहिले सुवर्ण पदक जिंकण्यानंतर काय भावना होती ?

उत्तर - हे माझे पहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण पदक होते. तसेच आशियायी अपंग स्पर्धांमधील भारताच्या इतिहासातील पहिले सुवर्ण पदक होते. भारतासाठी आणि माझ्यासाठीही हा मोठा आनंदाचा क्षण होता. या यशाने मला भारतीय असल्याचा अभिमान वाटला. हा खरचं एक उत्तम अनुभव होता.

प्रश्न: अंपगत्व आल्याच्या कटू अनुभवाबद्दल सांगा, या अपघातानंतर तणावाचा सामना केला का?

उत्तर - माझा अपघात घडला तेव्हा मी सहावीला होतो, आणि ते २००४ साल होते. मी आणि माझे कुटुंबिय माझ्या चुलत भावाच्या लग्न समारंभाला गेलो होतो. हॉलच्या छतावर जेथे लग्न होणार होते, तेथे मी खेळत होतो. त्यावेळी मी विजप्रवाह सुरु असलेल्या एका उघड्या तारेला हात लावला. त्यानंतर माझे दोन्ही हात अपंग झाले. त्यामुळे डॉक्टरांनी माझे दोन्ही हात कोपरापासून कापून काढण्याचा निर्णय घेतला.

ज्या वेळी ही घटना घडली तेव्हा मी खूप लहान होतो. माझ्यासोबत काय घडले याची देखील मला जाणीव नव्हती. त्यामुळे मी तणावात नव्हतो, माझे कुटुंबिय तणावात होते. दोन्ही हात गमावल्याने मी नाराज होतो. मात्र, तणावात नव्हतो. या कठीण प्रसंगातून बाहेर येण्यासाठी मी कोणचेही विशेष सहकार्य घेतले नाही. हळूहळू मी स्वावलंबी बनत गेलो. माझ्या स्वत:च्या प्रयत्नाने दैनिंदिन कामे करु लागलो. त्यानंतर एकेदिवश मी पूर्णपणे स्वावलंबी झालो.

प्रश्न - तुमच्या प्रवासात वडिलांनी मोठी मदत केल्याचे तुम्ही सांगता. वडीलच पहिले प्रशिक्षक होते. राष्ट्रीय जलतरणपटू असलेल्या तुमच्या वडिलांबद्दल सांगा

उत्तर - १९७८ साली राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेसाठी माझ्या वडीलांची निवड झाली होती. मात्र, काही अडचणींमुळे ही स्पर्धा रद्द झाली. भारतासाठी सुवर्ण पदक घेण्याचे त्यांचे स्वप्न भंग झाले. मात्र, त्यांचे स्वप्न मी पूर्ण करावे, अशी त्यांची इच्छा होती. माझे वडील माझे पहिले प्रशिक्षक होते. त्यांनी मला पोहण्याचे प्राथमिक धडे दिले.

प्रश्न - तुमच्या फिजिकल फिटनेसची दिनचर्या सांगा. इतर जलतरणपटूपेक्षा ते कसे वेगळे आहे.

उत्तर - मी धावण्याच सराव करतो. बॉक्सिंगचे ग्लोव्ज घालून मी जोर(पुशअप्स) मारतो. तसेच इतर व्यायामही करतो. मी व्यायामात काही बदल केले असून त्यानुसार व्यायाम करतो. शरिराच्या वरच्या भागाचा पुरेसा व्यायाम करुन मी खालच्या भागावर लक्ष्य केंद्रित करतो.

पोहण्याआधी आणि नंतर जो ठरलेला व्यायाम आहे, तो मी दैनंदिन करतो. या शिवाय बुधवार आणि शनिवार शारीरिक तंदुरुस्तीसाठी राखीव ठेवला आहे.

मी धावपटू असल्याने आहाराचे पालन करतो. आहारात प्रोटिन आणि कॅलरीचा समतोल साधलेला आहे. मासे, चिकन मुख्य:ता माझ्या आहारात असतात. आठवड्यातून एक दिवस मी हवे ते खाण्यासाठीही ठेवला आहे.

प्रश्न - कोरोनामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन सुरु आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक खेळाडू अडचणींचा सामना करत आहेत. या काळात तुम्ही कसं फिट राहता.

उत्तर - कोरोनामुळे सर्व जलतरण तलाव बंद आहेत. त्याचा माझ्यावर आणि इतर जलतरणपटूवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, मी हार मानली नसून घरीच व्यायाम करतो. कोणत्या प्रकारे धावण्याच्या सरावाने मला पोहताना मदत होईल, तसे धावण्याचा मी प्रयत्न लॉकडाऊनमध्ये करतो.

प्रश्न: भारत क्रिकेटचा मोठा चाहता आहे. क्रिकेटमुळे इतर क्रीडा प्रकार झाकोळले गेलेत असे वाटते का? इतर क्रीडा प्रकारांना पुढे आणण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत?

उत्तर - क्रिकेटपटू आणि जलतरणपटूंना जे बक्षिस मिळते, त्यामध्ये खुप मोठी तफावत आहे. अनेकांना माझे मत पटणार नाही. मात्र, ही तफावत मोठी अडचण आहे. क्रिकेट असोशिएशनद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये खेळाडू सराव करतात. मात्र, पोहण्यासाठी अशा कोणत्याही सुविधा पुरविण्यात येत नाही. जागतिक स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी सर्वांनी इतर खेळाडूनांही प्रोत्साहन दिलं पाहिजे.

जलतरणाबाबत विचार करता, अपंगांना सराव करण्यासाठी अनेक बदल करावे लागतात. प्रत्येक स्विमिंग पूलमध्ये रॅम्प असणे गरजेचे आहे. जर एखादा जलतरणपटू अंध असेल तर त्याला घेवून जाण्यासाठी इतर व्यक्तीची गरज लागते. जर असे बदल केले तर क्रिकेटला जे यश मिळाले, ते आम्हालाही मिळेल. खेळांच्या विकासासाठी माध्यमेही मोठी भूमिका निभावतात. माध्यमांमधून आमच्याकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही. यामध्ये बदल व्हायला पाहिजे.

प्रश्न - कोणत्या खेळाडूला तुम्ही सर्वात जास्त फॉलो करता?

उत्तर - जलतरणचा विचार करत असाल तर मी माईकल फिलिप्सला फॉलो करतो. सर्वांगिण विचार करता मला उसेन बोल्ट आवडतो. मी विराट कोहलीलाही फॉलो करतो. शीस्त आणि सातत्यासाठी मला सचिन तेंडूलकर आवडतो.

प्रश्न - टोकियो ऑलंपिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तुमच्या प्रशिक्षणावर त्याचा कसा परिणाम झालाय?

उत्तर - हे तर उघड आहे की, या भव्य क्रीडा स्पर्धांच्या तयारीचा फक्त माझ्यावरच नाही तर सर्वच खेळाडूंवर परिणाम झाला आहे. मी या घटनेला सकारात्मकरित्या घेतले असून माझी तंदुरुस्ती वाढवली आहे. मी सुवर्ण पदक मिळविण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी सराव चालू आहे.

प्रश्न - देशातील उभरत्या जलतरणपटूंसाठी तुम्ही खरे प्रेरणास्त्रोत आहात. त्यांना कोणता संदेश देऊ इच्छिता?

उत्तर - मी माझ्या जीवनामध्ये एका गोष्टीचे पालन केले आहे. जे तुमच्याकडे आहे, त्याचा विचार करा, जे नाही त्याचा विचार करु नका. तुमच्या आवडत्या गोष्टींचा पाठलाग करा, यश नक्कीच मिळेल. फक्त कठीण परिश्रम तुम्हाला यशापर्यंत घेवून जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.