ETV Bharat / sports

Commonwealth Games 2022 : 10 किमी वॉक रेसमध्ये प्रियांका गोस्वामीने जिंकले रौप्य पदक

author img

By

Published : Aug 6, 2022, 4:53 PM IST

भारताच्या प्रियांका गोस्वामीने 10 किमी वॉक रेसमध्ये रौप्य पदक ( Priyanka Goswami won silver medal ) जिंकले. त्याचवेळी केनियाच्या एमिलीने 43.50.86 मिनिटांत शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान पटकावले.

priyanka goswami
प्रियांका गोस्वामी

बर्मिंगहॅम: कॉमनवेल्थ गेम्स 2022 ( Commonwealth Games 2022 ) स्पर्धेत भारताला अजून एक पदक मिळाले आहे. प्रियांका गोस्वामीने महिलांच्या 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले ( Priyanka Goswami won silver medal ) आहे. तिने 43.38 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने 42.34 मिनिटात शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. त्याचवेळी केनियाच्या एमिलीने 43.50.86 मिनिटांत शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान पटकावले.

भारताचे पदक विजेते -

9 सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि दीपक पुनिया

9 रौप्य: संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशु मलिक आणि प्रियांका

9 कांस्य: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन आणि मोहित ग्रेवाल.

हेही वाचा - Cwg 2022 Fih Apologizes : एफआयएचने 'त्या' गोष्टीबद्धल मागितली माफी; वीरेंद्र सेहवागने केले खोचक ट्विट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.