Rohit Sharma Record: 'हिटमॅन'च्या वनडेत १०,००० धावा पूर्ण, सचिनचा 'हा' रेकॉर्ड मोडला

Rohit Sharma Record: 'हिटमॅन'च्या वनडेत १०,००० धावा पूर्ण, सचिनचा 'हा' रेकॉर्ड मोडला
Rohit Sharma Record : एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ द्विशतकं झळकावणारा जगातील एकमेव फलंदाज रोहित शर्मानं आणखी एक मैलाचा दगड गाठला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीनंतर सर्वात जलद १०,००० धावा करणारा तो दुसरा खेळाडू बनला आहे.
कोलंबो Rohit Sharma Record : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं सोमवारी (११ सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करत आतंरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये १३,००० धावांचा टप्पा गाठला. ही कामगिरी करणारा तो जगातील सर्वात वेगवान फलंदाज बनला आहे. त्याच्यापाठोपाठ आता कर्णधार रोहित शर्मानही एक विक्रम केला.
-
🚨 Milestone 🔓
— BCCI (@BCCI) September 12, 2023
1⃣0⃣0⃣0⃣0⃣ ODI runs & counting 🙌 🙌
Congratulations to #TeamIndia captain Rohit Sharma 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/P0ylBAiETu #AsiaCup2023 | #INDvSL pic.twitter.com/STcUx2sKBV
-
1️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣ ODI runs for the 🇮🇳 skipper!
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 12, 2023
Another milestone🔓 by the Hitman! 💙#ACC pic.twitter.com/ETJ8Z5LjIo
रोहितनं वनडेमध्ये १०,००० धावांचा पल्ला गाठला : रोहितनं मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध आशिया चषक सुपर फोर सामन्यात ४८ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान २२ वी धाव पूर्ण करताच त्यानं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा पल्ला गाठला. असं करणारा तो भारताचा सहावा आणि जगातील १५ वा फलंदाज ठरला आहे. वेगवान गोलंदाज कसून राजिताच्या डोक्यावर षटकार मारत त्यानं हा टप्पा गाठला.
-
Who needs superheroes when we have the #Hitman? 💯@ImRo45 joins the elite 10,000 ODI runs club in style, becoming the 2nd fastest to achieve this feat! 😍⚡
— Star Sports (@StarSportsIndia) September 12, 2023
Tune-in to #AsiaCupOnStar, LIVE now on Star Sports Network#INDvSL #Cricket pic.twitter.com/lRSEsXQtAN
-
Among the 15 batters with 10,000 ODI runs, Rohit Sharma is the second-fastest to the milestone, right after Virat Kohli 🙌 pic.twitter.com/wqjNMbhEWA
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 12, 2023
भारताच्या या फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे : रोहितच्या आधी भारताकडून सचिन तेंडुलकर (१८,६२६ धावा), विराट कोहली (१३,०२४ धावा), सौरव गांगुली (११,३६३ धावा), राहुल द्रविड (१०,८८९ धावा) आणि महेंद्रसिंग धोनी (१०,७३३ धावा) यांनी वनडेमध्ये दहा हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. रोहितचा हा २४८ वा एकदिवसीय सामना असून त्यानं २४१ व्या डावात १०,००० धावांचा टप्पा गाठला. विराट कोहलीनं (२०५ डाव) त्याच्यापेक्षा कमी डावात ही कामगिरी केली आहे. तर सचिननं २५९ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता.
-
Milestones of Rohit Sharma today:
— Johns. (@CricCrazyJohns) September 12, 2023
- 2nd fastest to complete 10,000 runs.
- fastest to complete 8000 runs as an opener.
- First Indian to complete 10 fifty plus score in Asia Cup
- Most runs in Asia Cup 2023
- An all-time legend. pic.twitter.com/ImNkHkpt5p
-
This hitman's hits are hazaar१० ⚠️#RohitSharma reaches 10000 runs in ODIs.#INDvSL live now only on #DisneyPlusHotstar, free on the mobile app.#FreeMeinDekhteJaao #AsiaCup2023 #AsiaCupOnHotstar #Cricket pic.twitter.com/UhAs9QyWf7
— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) September 12, 2023
तीन द्विशतकं झळकवणारा एकमेव फलंदाज : रोहित शर्मा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्यानं ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं झळकावली आहेत. त्यानं नोव्हेंबर २०१४ मध्ये कोलकाता येथे श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांची खेळी खेळली. ती एकदिवसीय क्रिकेटमधील कोणत्याही फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या आहे. रोहितनं नोव्हेंबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ आणि डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद २०८ धावा केल्या होत्या. आतापर्यंत त्यानं या फॉरमॅटमध्ये ३० शतकं झळकावली आहेत.
-
Historic - Rohit Sharma becomes the 2nd fastest ever in history to reach 10,000 ODI runs. pic.twitter.com/Vufv2npuyr
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 12, 2023
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत : २३ जून २००७ रोजी बेलफास्ट येथे आयर्लंडविरुद्ध वनडे पदार्पण करणाऱ्या रोहितनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक २,२५१ धावा केल्या आहेत. त्यानं श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्धही १५०० हून अधिक धावा केल्या आहेत.
हेही वाचा :
