ETV Bharat / sports

ICC Women World Cup : आयसीसी महिला विश्वचषकापूर्वी कर्णधार बिस्माह मारूफचे मोठे वक्तव्य

author img

By

Published : Feb 18, 2022, 5:53 PM IST

Bismah Maroof
बिस्माह मारूफ

4 मार्चपासून न्यूझीलंडमध्ये महिला विश्वचषकाला ( Women World Cup in New Zealand ) सुरुवात होणार आहे. पाकिस्तान संघ आपल्या मोहिमेची सुरुवात भारताविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. हा सामना 6 मार्च रोजी माऊंट मौनगानुई येथे होणार आहे. या अगोदर कर्णधार बिस्माह मारूफने आपले मत व्यक्त केले आहे.

ऑकलंड : आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women World Cup ) स्पर्धेला चार मार्च पासून सुरुवात होणार आहे. यंदा आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा न्यूझीलंड येथे आयोजित केले गेली आहे. या अगोदर पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह मारूफला ( Pakistan captain Bismah Maroof ) वाटते की, त्यांचा संघ 4 मार्चपासून सहा ठिकाणी खेळल्या जाणार्‍या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. त्याचबरोर बिस्माह म्हणाली की, त्यांच्या संघासाठी ही चांगली संधी असणार आहे.

कर्णधार बिस्माह मारूफ शुक्रवारी आयसीसीला म्हणाली ( Bismah Maruf told the ICC ), ''महिला विश्वचषक हा असा एक मंच आहे, जिथे तारे जन्माला येतात आणि हा अंतिम टप्पा आहे. जिथे क्रिकेटपटू आपला वारसा कायमचा सोडू शकतात. महिला विश्वचषक ही पाकिस्तानसाठी मोठी संधी आहे.''

बिस्माह मारूफ पुढे म्हणाली, "आम्ही कधीही ( Pakistan women cricket team ) दोन फॉरमॅटमध्ये कोणत्याही विश्वचषकाच्या बाद फेरीपर्यंत पोहोचू शकलो नाही. पण याचा अर्थ असा नाही की वेळ कधीच येणार नाही. जावेरिया खान, निदा दार, डायना बेग आणि अनम अमीन यांच्या अनुभवाने, या संघातील विलक्षण प्रतिभा फातिमा सना आणि गुलाम फातिमा, आलिया रियाझ आणि ओमामा सोहेल या सुंदर देशात इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत.

बिस्माह म्हणाले की, कठोर परिश्रमाने पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला चॅम्पियनशिप 2017/20 ( ICC Women Championship 2017/20 ) हंगामातील सर्वोत्तम संघ म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. भारताविरुद्ध संघाचा सलामीचा सामना उपखंडातील महिला क्रिकेटसाठी मोठी संधी निर्माण करेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.