ETV Bharat / sports

IPL 2022, SRH vs LSG: नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय;जेसन होल्डर लखनौकडून करणार पदार्पण

author img

By

Published : Apr 4, 2022, 7:17 PM IST

SRH vs LSG
SRH vs LSG

आयपीएल 2022 मधील बारावा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad ) यांच्यात होणार आहे. त्या अगोदर सनरायझर्स संघाने नाणेपेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील बारावा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad ) यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. त्या अगोदर दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर लखनौ सुपरजायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

आयपीएलच्या इतिहासात या दोन संघात प्रथमच सामना होत आहे. कारण लखनौ सुपरजायंट्स यंदाच्या हंगामात नव्याने सहभागी झाला आहे. आजच्या सामन्यासाठी लखनौ सुपरजायंट्स संघात एक बदल करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे जेसन होल्डर आज लखनौ सुपर जायंट्सकडून पदार्पण करणार आहे. त्याला पदार्पणाची कॅप मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर ( Head Coach Andy Flower ) यांनी दिली. सनरायझर्स हैदराबाद संघात आज कोणताही बदल करण्यात आला नाही.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई आणि आवेश खान.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, अब्दुल समद, रोमॅरियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिक.

हेही वाचा - Sri Lankan Cricketers Expressed: श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी आपल्या देशाच्या दुर्दशेवर व्यक्त केली चिंता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.