ETV Bharat / sports

IPL 2022 Updates: मुंबई इंडियन्सला पराभवानंतर दुसरा धक्का; रोहित शर्माला ठोठावला 12 लाखाचा दंड

author img

By

Published : Mar 28, 2022, 3:45 PM IST

Rohit Sharma
Rohit Sharma

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2022 ( IPL 2022 ) चा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सकडून चार गडी राखून हरला. हा सामना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा दुहेरी पराभव होता. प्रथम संघ हरला, त्यानंतर त्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

मुंबई: आयपीएल 2022 च्या हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( MI vs DC ) संघात पार पडला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 4 विकेट्सने मुंबई संघाला पराभवाचे पाणी पाजले. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाला दुसरा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माला ( Captain Rohit Sharma fined ) सामन्यादरम्यान षटकांची गती कमी ( Slow Over Rate ) राखल्याबद्दल 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians team ) संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 177 धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात दिल्ली संघाने अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी सातव्या विकेट्साठी नाबाद 75 धावांची खेळी करताना 18.2 षटकांत 6 बाद 179 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याचबरोबर कुलदीप यादवने देखील गोलंदाजीमध्ये योगदान देताना 3 विकेट्स घेतल्या.

आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत किमान ओव्हर रेटच्या गुन्ह्यांशी संबंधित हंगामातील हा संघाचा पहिला गुन्हा होता, असे आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर 12 लाखांचा दंड ( Rohit Sharma fined Rs 12 lakh ) ठोठावण्यात आला आहे. अक्षर पटेल आणि ललित यादव यांच्या शानदार खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने IPL 2022 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चार विकेट्सनी पराभव केला.

सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, मला वाटले की, ही चांगली धावसंख्या आहे. सुरुवातीला तुम्हाला 170 प्लस धावा करता येतील, अशी खेळपट्टी दिसत नव्हती. फक्त आमच्या अनुसार गोलंदाजी झाली नाही. पहिला सामना असो किंवा शेवटचा सामना असो, आम्हाला प्रत्येक सामना जिंकायचा आहे.

हेही वाचा - Ipl 2022 Pbks Vs Rcb: रोमांचक झालेल्या सामन्यात पंजाबचा बंगळुरुवर पाच विकेट्सने शानदार विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.