ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : फॉर्म बिघडलेल्या विराटला रवी शास्त्रींचा महत्वाचा सल्ला, म्हणाले...

author img

By

Published : Apr 20, 2022, 3:51 PM IST

आयपीएल 2022 च्या लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli ) गोल्डन डक ठरला. अशा परिस्थितीत आता त्याच्या खराब फलंदाजीची चर्चा होत आहे. दरम्यान, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोहलीला मोठा सल्ला दिला आहे.

Ravi shastri
Ravi shastri

मुंबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Former captain Virat Kohli ) मागील काही महिन्यांपासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. विराट कोहलीला 2019 पासून एक ही शतक लगावता आले नाही. त्याचबरोबर तो सध्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सहभागी आहे. या स्पर्धेतील सात सामन्यात आरसीबीकडून खेळताना एक ही शतक लगावता आले नाही. तसेच लखनौ विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला एक सल्ला ( Ravi Shastri's advice to Virat Kohli ) दिला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Former head coach Ravi Shastri ) म्हणाले की, विराट कोहलीने खराब फॉर्ममधून सावरण्यासाठी खेळातून विश्रांती घ्यावी ( Virat Kohli should take a break ), असा सल्ला दिला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा माजी कर्णधार कोहलीने गेल्या वर्षी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. नोव्हेंबर 2019 पासून त्याने कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलेले नाही.

सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये ( Indian Premier League ) त्याने तितकाच निराशाजनक काळ अनुभवला आहे. त्याने सात सामन्यांत 19.83 च्या सरासरीने केवळ 119 धावा केल्या आहेत. मंगळवारी, डीवाय पाटील स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात कोहली पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर शास्त्रीने स्टार स्पोर्टसच्या शोमध्ये म्हणाले, मी थेट मुख्य खेळाडूकडे जात आहे. विराट कोहली खराब फॉर्ममधून जात असून त्याला विश्रांतीची गरज आहे. कोहलीने 2019 मध्ये कोलकाता कसोटीत बांगलादेशविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते.

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसननेही ( Kevin Peterson ) शास्त्री यांच्याशी सहमती दर्शवली आणि सांगितले की, कोहलीला आपली नवी ऊर्जा परत मिळवण्यासाठी काही काळ खेळ आणि सोशल मीडियापासून दूर राहावे लागेल. पीटरसन म्हणाला, तो अनेक गोष्टींमध्ये गुंतलेला असतो. तो या खेळाचा सर्वात मोठा स्टार आहे. विराट कोहलीला काही काळ विश्रांती घेण्याची नितांत गरज आहे. त्याला सोशल मीडियापासून दूर राहून स्वत:ला पुन्हा जोमाने उभे करावे लागेल.

हेही वाचा - Ipl 2022 Lsg Vs Rcb : लखनौ संघाला पराभवानंतर मोठा धक्का, 'या' दोन खेळाडूंवर झाली कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.