ETV Bharat / sports

IPL 2022 LSG Vs RCB : लखनौ संघाला पराभवानंतर मोठा धक्का, 'या' दोन खेळाडूंवर झाली कारवाई

author img

By

Published : Apr 20, 2022, 3:13 PM IST

LSG
LSG

नवी मुंबईतील डीवीय पाटील स्टेडियमवर मंगळवारी (19 एप्रिल) लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( LSG vs RCB ) संघात सामना खेळला गेला. हा सामना आरसीबी संघाने 18 धावांनी जिंकला. त्यानंतर पराभूत झालेल्या लखनौ संघातील दोन खेळांडूवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या 31 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनौचा सुपर जायंट्सचा 18 धावांनी पराभव करत जिंकला. या पराभवानंतर लखनौचा सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. सुपर जायंट्स संघाचे मार्कस स्टॉइनिस ( Marcus Stoinis ) आणि कर्णधार केएल राहुलवर ( Captain KL Rahul ) आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ( IPL code of conduct ) कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही खेळाडूंनी आपली चूक मान्य केली आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचा ( Lucknow Super Giants ) कर्णधार केएल राहुलला आचारसंहिता भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. केएल राहुलने लेव्हल 1 च्या गुन्ह्यात आपली चूक मान्य केली आणि शिक्षा स्वीकारली आहे. त्याचवेळी मार्कस स्टॉइनिसने जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर अंपायरवर आपला राग दाखवला आणि याच कारणामुळे त्याला इशाराही देण्यात आला आहे. तथापि, मार्कस स्टॉइनिस नशीबवान होता की, त्याच्याविरुद्ध कोणताही दंड आकारला गेला नाही. भविष्यात त्यांनी अशी चूक पुन्हा केल्यास त्याला दंडही होऊ शकतो.

तत्पुर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore ) संघाने निर्धारीत 20 षटकांत 6 गडी गमावून 181 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये कर्णधार फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. ज्यामध्ये फक्त चार धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. त्याने 64 चेंडूचा सामना करताना 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 96 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेलने 23 आणि शाहबाज अहमदने 26 धावांचे योगदान दिले.

182 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या संघाकडून क्रुणाल पांड्याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 28 चेंडूत 42 धावांचे योगदाने दिले. त्याचबरोबर केएल राहुल 30 आणि मार्कस स्टॉइनिसने 24 धावा केल्या. आरसीबीकडून जोश हेझलवूडने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 25 धावा देताना 4 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा - LSG Vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा लखनौ सुपर जायंट्सवर १८ धावांनी विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.