ETV Bharat / sports

IPL 2022, SRH vs LSG: आज हैदराबादला पहिल्या विजयाची अपेक्षा, तर लखनौ संघाला कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान

author img

By

Published : Apr 4, 2022, 4:01 PM IST

SRH vs LSG
SRH vs LSG

लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( SRH vs LSG ) आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील बारावा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसात वाजता मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरु होईल. या सामन्यात हैदराबाद संघ आपला पहिला विजय नोंदवताना झगडताना दिसणार आहे.

हैदराबाद : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील बारावा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad ) यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. आयपीएलच्या इतक्या वर्षात या दोन संघात प्रथमच सामना होत आहे. कारण लखनौ सुपरजायंट्स यंदाच्या हंगामात नव्याने सहभागी झाला आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व केन विल्यमसनच्या ( Ken Williamson ) खांद्यावर आहे. त्याचबरोबर लखनौ सुपरजायंट्स संघाच्या नेतृत्वाची धुरा केएल राहुलच्या ( KL Rahul ) खांद्यावर आहे. या हंगामात हैदराबाद संघाचा फक्त एक सामना झाला आहे. त्या सामन्यात त्यांना राजस्थान रॉयल्सकडून दारुन पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांना या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे गरजेचे आहे. लखनौ सुपरजायंट्स संघाचे आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. त्यापैकी एका सामन्यात विजय तर एकात पराजय स्वीकारावा लागला आहे. त्यापैकी चेन्नई विरुद्धच्या विजयाने त्यांच्या संघात आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.

सनरायझर्स हैदराबादला ( Sunrisers Hyderabad ) पहिल्या सामन्यात बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत चांगली कामगिरी करता आली नाही. संघाची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. मधल्या फळीत एडन मार्करामच्या बॅटमधून धावा आल्या, तर वॉशिंग्टन सुंदरनेही आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली. निकोलस पूरन, अभिषेक शर्मा आणि अब्दुल समद या आक्रमक फलंदाजांनी पूर्णपणे निराश केले होते. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार संघासाठी यशस्वी ठरला, इतर सर्व गोलंदाज खूप महागडे ठरले आणि त्यांना विकेटही घेता आली नाही. या सामन्यात संघाला त्यांच्या नो-बॉलच्या समस्येकडेही लक्ष द्यावे लागणार आहे, अन्यथा त्यांना पुन्हा एकदा फटका सहन करावा लागू शकतो.

लखनौ सुपर जायंट्सचा ( Lucknow Super Giants ) संघ हळूहळू वेग पकडत आहे आणि संघाच्या प्रमुख खेळाडूंची कामगिरी गेल्या सामन्यात दिसून आली. केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांच्या जोडीने संघाला पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीची आशा असेल. मधल्या फळीत मनीष पांडेचा फॉर्म खराब आहे आणि त्यात काही बदल होण्याची शक्यता आहे. संघाकडे एविन लुईस, दीपक हुडा आणि आयुष बदोनीसारखे स्फोटक फलंदाज आहेत, जे उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजीत संघाचा पाचवा गोलंदाजीचा पर्याय मजबूत दिसत नाही. अशा परिस्थितीत या सामन्यातून निवडीसाठी उपलब्ध असलेल्या जेसन होल्डरचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश केला जाऊ शकतो. संघ त्याला कोणाच्या जागी संधी देतो, हे पाहणे बाकी आहे.

सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेईंग इलेव्हन: केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिक.

लखनौ सुपरजायंट्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमीरा आणि आवेश खान.

हेही वाचा - IPL 2022 Point Table : आयपीएल 2022च्या पहिल्या 10 सामन्यानंतर 'अशी' आहे गुणतालिका; जाणून घ्या सर्व एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.