ETV Bharat / sports

IPL 2022 Point Table : आयपीएल 2022च्या पहिल्या 10 सामन्यानंतर 'अशी' आहे गुणतालिका; जाणून घ्या सर्व एका क्लिकवर

author img

By

Published : Apr 3, 2022, 8:05 PM IST

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ( Fifteenth season of IPL ) पहिल्या आठवड्यात 10 सामने पार पडले आहे. त्यामुळे गुणतालिकेत कोणता संघ अव्वला आहे, त्याचबरोबर ऑरेंज आणि पर्पल कॅप कोणाकडे आहे. याचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहे.

IPL 2022
IPL 2022

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे पंधराव्या हंगामातील पहिला आठवडा उलटून गेला आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील पहिले 10 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये काही संघाचे तीन तर काहीचे एक, दोन सामने झाले आहेत. त्यामुळे आज आपण मागील 10 सामन्यात काही घडले आहे. त्यावर एक नजर टाकणार आहोत.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुणतालिकेत ( Point table of the fifteenth season ) अव्वल स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. या संघाने दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने जिंकल्याने त्यांचे चार गुण झाले आहेत. त्याचबरोबर या संघाचे नेट रनरेट +2.100 आहे. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आहे. ज्याने आपल्या तीन सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. त्यामुळे यांचेदेखील चार गुण झाले आहे. परंतु त्यांचा नेट रनरेट +0.843 आहे. तिसऱ्या क्रमांकावर गुजरात टायटन्स संघ आहे. या संघाने देखील आपले दोन्हीच्या दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे या देखील संघाचे गुण चार आहेत, या संघाचे नेट रनरेट +0.495 असल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

10 सामन्यांनतर जास्त विकेट्स घेतल्याने मिळणारी पर्पल कॅप ( Purple Cap contender ) सध्या केकेआरच्या उमेश यादवच्या डोक्यावर आहे. त्याने तीन सामन्यात 7.38 च्या सरासरीने 59 धावा देताना 8 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो पर्पल कॅपच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर रॉजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आहे. ज्याने दोन सामन्यात 48 धावा देताना 9.60 च्या सरासरीने 5 विकेट्स चटकावल्या आहेत. त्याचबरोबर या यादीत तिसऱ्या स्थानी पंजाब किंग्स संघाचा मोहम्मद शमी आहे. ज्याने दोन सामन्यात 55 धावा देताना 11 च्या सरासरीने 5 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. ही ऑरेंज कॅप ( Orange Cap contender ) 10 सामन्यांतर कोणाकडे आहे, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सध्या ऑरेंज कॅप मुंबई इंडियन्सच्या इशान किशनकडे आहे. त्याने दोन सामन्यात 135 सरासरीने आणि 148.35 च्या स्ट्राईक रेटने 135 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर आहे. त्याने 67.50 सरासरीने आणि 140.62 च्या स्ट्राईक रेटने 135 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर पंधराव्या हंगामातील पहिले शतक त्याच्या बॅटमधून आले आहे, तर तिसऱ्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा आंद्रे रसेल आहे. त्याने दोन सामन्यात 95.00 च्या सरासरीने आणि 193.88 च्या स्ट्राईक रेटने 35 धावा केल्या आहेत.

हेही वाचा - IPL 2022 Updates : मुंबईच्या सलग दुसऱ्या पराभवावर तिलक वर्माची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.