ETV Bharat / sports

न्यूझिलंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही सुरू केला दौऱ्याचा फेरविचार

author img

By

Published : Sep 17, 2021, 8:58 PM IST

इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही सुरू केला दौऱ्याचा फेरविचार
इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही सुरू केला दौऱ्याचा फेरविचार

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा रद्द करण्यात आल्याच्या काही तासांनंतर, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानेही आपल्या नियोजित दौऱ्याबद्दल फेरविचार करण्यास सुरुवात केली आहे. येत्या 48 तासात याबाबतचा निर्णय ईसीबी घेणार आहे.

लंडन - न्यूझीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा रद्द करण्यात आल्याच्या काही तासांनंतर, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, ते पाकिस्तानातील स्थानिक परिस्थितीचा आढवा घेऊन पुढील 48 तासामध्ये दहशतावादाने ग्रस्त असलेल्या देशाचा दौरा करायचा की नाही यावर निर्णय घेतील.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी सुरक्षा संबंधी धमकी मिळाल्यानंतर पहिल्या वनडेपूर्वी पाकिस्तान दौऱ्यातून आपल्या संघाचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ दोन टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ऑक्टोबरमध्ये रावळपिंडीचा दौरा करणार आहे. 2005 नंतर त्यांचा हा पहिला पाकिस्तान दौरा असेल.

ईसीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "सुरक्षेच्या धोक्यामुळे न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतल्याच्या निर्णयाची आम्हाला माहिती आहे. परिस्थिती पूर्णपणे समजून घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या आमच्या सुरक्षा पथकाशी आम्ही संपर्क साधत आहोत. ईसीबी बोर्ड पुढील 24 ते 48 तासांमध्ये आमचा दौरा वेळापत्रकानुसार होईल की नाही हे ठरवेल.''

न्यूझीलंड दौरा रद्द होणे हा पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी मोठा धक्का आहे. पाकिस्तान सुपर लीग आणि काही देशांच्या दौऱ्यांमुळे पाकिस्तानमध्ये काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्ववत झाले आहे. पण प्रमुख कसोटी राष्ट्रांनी बऱ्याच काळापासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही.

वेस्ट इंडिजचा पाकिस्तान दौरा डिसेंबरमध्ये होणार आहे आणि त्यात तीन एकदिवसीय आणि अनेक टी -20 सामने असतील. ऑस्ट्रेलिया संघाला पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि तितकेच टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत.

हेही वाचा - मोठी बातमी! विश्वकरंडकानंतर टी 20 संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीने केले जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.