ETV Bharat / sports

'डीन'ला विजयी निरोप देण्यासाठी आफ्रिकेचा 'एल्गार'; भारतीय संघाची केपटाऊनमध्ये 'कसोटी'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 9:51 AM IST

IND vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून केपटाऊनमध्ये सुरू होणार आहे. सध्या भारतीय संघ 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 नं पिछाडीवर आहे. हा सामना जिकून मालिका अनिर्णीत राखण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरेल.

IND vs SA 2nd Test match
IND vs SA 2nd Test match

केपटाऊन IND vs SA 2nd Test : भारतीय संघ आजपासून यावर्षीच्या क्रिकेट मोहिमेला सुरुवात करत आहे. केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत भारतीय संघाचा दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील या दुसऱ्या सामन्यात विजयाची नोंद करुन मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारतीय संघावर प्रचंड दबाव असणार आहे.

मालिका अनिर्णीत ठेवण्याच्या इराद्यानं भारतीय संघ उतरणार मैदानात : या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं गमावलाय. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचं भारतीय संघाचं स्वप्न भंगलंय. आता ही कसोटी मालिका अनिर्णित ठेवण्याच्या उद्देशानं भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. हा सामना न्यूलँड्स, केपटाऊन इथं होणार आहे. भारतीय संघाचा रेकॉर्ड इथं खूपच खराब राहिलाय. या मैदानावर भारतीय संघानं आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलाय. तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. केपटाऊनमध्ये आजपर्यंत एकही कसोटी सामना भारतीय संघाला जिंकता आलेला नाही. भारतीय संघ केपटाऊन मैदानावरील हा खराब रेकॉर्ड सुधारण्याचाही प्रयत्न करेल.

केपटाऊनच्या मैदानावर खेळणं सोपं नाही : भारतीय संघानं 1992 मध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळण्यास सुरुवात केली. या 31 वर्षांत भारतीय संघ केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमवर सहा कसोटी सामने खेळलाय. पण एकही सामना जिंकू शकलेला नाही. 2018 आणि 2022 मध्ये इथं खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब आहे. या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी चार डाव खेळले. परंतु त्यांची सर्वोच्च धावसंख्या केवळ 223 धावांची होती. 2018 मध्ये त्यांनी 209 आणि 135 धावा केल्या, तर 2022 मध्ये त्यांनी 223 आणि 198 धावा केल्या. यावरून येथील परिस्थिती फलंदाजांसाठी सोपी राहणार नसल्याचं दिसून येतंय.

एल्गारचा शेवटची कसोटी : आफ्रिकेचा दिग्गज डावखुरा सलामीवीर फलंदाज डीन एल्गार आज आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून त्याला विजयी निरोप देण्याचा आफ्रिकेचा प्रयत्न असेल. एल्गारनं 85 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलंय. एल्गार त्याच्या उत्कृष्ट फलंदाजी तंत्रासाठी ओळखला जातो. एल्गारची फलंदाजीची शैली कसोटीसाठी योग्य आहे. एल्गारची आकडेवारी सुद्धा हेच दर्शवते. एल्गारनं 85 कसोटी सामन्यांत 150 डावात फलंदाजी करताना एकूण 5331 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 14 शतकं आणि 23 अर्धशतकं आहेत. 199 ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताविरुद्धच्या सेंच्युरियन येथील पहिल्या कसोटीत एल्गारनं 185 धावांची इनिंग खेळली होती.

दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन :

  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा/मुकेश कुमार
  • दक्षिण आफ्रिका : डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जॉर्जी, कीगन पीटरसन, झुबेर हमझा, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेने (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, केशव महाराज/लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर

हेही वाचा :

  1. कसोटी क्रिकेटचे दिग्गज वॉर्नर अन् एल्गर खेळणार अखेरचा सामना, एक नजर आकडेवारीवर
  2. क्रिकेट चाहत्यांना यंदा टी-२० वर्ल्डकपची मेजवानी, 'या' महिन्यात रंगणार आयपीएलचा थरार; जाणून घ्या टीम इंडियाचं वर्षभराचं वेळापत्रक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.