ETV Bharat / sports

IND vs BAN : हार्दिक पंड्या स्कॅनसाठी रुग्णालयात, पांड्या गोलंदाजी करणार का?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 8:22 PM IST

भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान हार्दिक पंड्याच्या पायाला मोठी दुखापत झाली. त्यासाठी त्यांना स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. हार्दिक पंड्या पहिल्याच षटकात जखमी झाला. त्यामुळे तो फलंदाजी करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

IND vs BAN
IND vs BAN

पुणे : भारतीय संघाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत मोठा धक्का बसलाय. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पहिल्याच षटकात जखमी झाला. त्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं. पांड्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. आजच्या सामन्यात तो गोलंदाजी करू शकणार नसल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं. स्कॅन अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

हार्दिक पांड्या रुग्णालयात : विश्वचषकाच्या 17व्या सामन्यात भारत, बांगलादेश यांच्यात सामना सुरू आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारतविरुद्ध बांगलादेश सामना खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तसंच भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करायला मैदानात उतरला त्यावेळी टीम इंडियाला नवव्या षटकात मोठा धक्का बसला. या सामन्यादरम्यान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झालीय. त्याचा पाय मुरगळ्यानं पांड्याला रुग्णालयात पायाच्या स्कॅनसाठी नेण्यात आलं. सध्या त्याच्यावर वैद्यकीय पथक उपचार करत आहे. हार्दिक पांड्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आलंय. हार्दिक रुग्णालयात गेल्यामुळं त्याची मैदानात खेळण्याची शक्यता कमी दिसतेय.

24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा बांगलादेशचा निर्णय पहिल्या 20 षटकांत योग्य ठरला. सलामीवीर तनजीद हसन, लिटन दास यांनी 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. त्यात हार्दिक पांड्याच्या दुखापतीची भर पडली. विराट कोहली त्याचं षटक पूर्ण केलं. कुलदीप यादवनं हसनला बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. हसननं 43 चेंडूंत 5 चौकार, 3 षटकारांसह 51 धावा केल्या. हसन तसंच दास यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. ही एकदिवसीय विश्वचषकात बांगलादेशच्या सलामीवीरांची सर्वोत्तम भागीदारी आहे. 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रवींद्र जडेजानं नजमुल हुसेन शांतोला (8) बाद केलं. मात्र यानंतर भारतीय गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत बांगलादेशला बॅकफूटवर नेलं. बांगलादेशनं नियमित अंतरानं विकेट गमावल्या. फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर त्यांना केवळ 256 धावा करता आल्या. बांगलादेश 300+ धावा करेल असं वाटत होतं, पण त्यांना 256 धावाच करत आल्या. बांगलादेशकडून सलामीवीर लिटन दासनं 66 धावांची तर तनजीद हसननं 51 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा यांनी 2-2 विकेट घेतल्या. तसंच शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव यांनाही प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup २०२३ IND vs BAN : दुखापतीमुळं हार्दिक पंड्या मैदानाबाहेर; विराट कोहलीनं पूर्ण केलं षटक
  2. Mushfiqur Rahim Father : भारत-बांगलादेश सामन्याबद्दल मुशफिकूर रहीमच्या वडिलांची EXCLUSIVE मुलाखत; म्हणाले...
  3. India vs Bangladesh Match : भारत आणि बांगलादेशमध्ये पुण्यात सामना; पाहा काय म्हणाले क्रिकेटप्रेमी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.