ETV Bharat / sports

IND vs AUS T20 Series : विराट-सूर्याचे कौतुक करताना रोहितने 'या' दोन खेळाडूंचा केला वचाव, म्हणाला....!

author img

By

Published : Sep 26, 2022, 4:00 PM IST

भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल मात्र खूप महागडे ठरले आणि 12 च्या सरासरीने धावा दिल्या. त्यानंतर ही कर्णधार रोहित शर्माने या दोघांची पाठराखण ( Rohit Sharma Defends Bhuvneshwar and Harshal ) केली.

Rohit Sharma
रोहित शर्मा

हैदराबाद: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांचा बचाव केला ( Rohit Sharma Defends Bhuvneshwar and Harshal ) आहे. रोहितने टी20 विश्वचषकापूर्वी दोन्ही गोलंदाज फॉर्ममध्ये परतण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आशिया कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने तीन सामन्यांच्या T20I मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला ( India won the T20 series against Australia ). भुवनेश्वर आणि हर्षल मात्र खूप महागडे ठरले. या दोघांनी प्रत्येकी 12 पेक्षा जास्त सरासरीने धावा दिल्या.

कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) म्हणाला, भुवीला वेळ देण्याची गरज आहे. कारण संघात त्याच्यासारखा खेळाडू असल्यामुळे तो काय करू शकतो याची कल्पना येते. त्याचा खराब फॉर्म फार काळ टिकणार नाही. "आम्ही काही योजनांवर काम करत आहोत आणि आशा आहे की आम्ही त्याला डेथ ओव्हर्समध्ये अधिक गोलंदाजी पर्याय देऊ शकतो," असे कर्णधार म्हणाला. यामुळे तो पूर्वीप्रमाणे कामगिरी करू शकेल.

भुवनेश्वरमध्ये आत्मविश्वासाची कमतरता नाही -

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, भुवनेश्वरमध्ये ( Fast bowler Bhuvneshwar Kumar ) आत्मविश्वासाची कमतरता नाही. "मला वाटत नाही की त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे. आपण त्याच्यावर आणि त्याच्या कौशल्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. रोहित म्हणाला, आम्ही आमच्या बाजूने काय करता येईल हे पाहत आहोत. कारण डेथ ओव्हर्समध्ये काहीही होऊ शकते. अशा स्थितीत गोलंदाजीचे पर्याय असणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यानुसार क्षेत्र निश्चित करता येईल. त्यानुसार जुळवून घेण्यासाठी अनुभवाची गरज असते.

दुखापतीतून पुनरागमन करणे सोपे नाही -

तसेच प्रदीर्घ दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या हर्षलने तीन सामन्यांत आठ षटकांत 99 धावा दिल्या, पण एका मालिकेच्या आधारे त्याचे आकलन करणे योग्य नाही, असे रोहितने सांगितले. तो म्हणाला, हर्षल ( Fast bowler Harshal Patel ) आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. दुखापतीतून पुनरागमन करणे सोपे नाही. तो जवळपास दोन महिने खेळला नाही आणि पुनरागमन सोपे नाही. या मालिकेतील तीन सामन्यांच्या आधारे त्याचे आकलन करणे योग्य नाही. कारण तो काय करू शकतो हे आम्हाला माहीत आहे.

गोलंदाजी हा मुख्य फोकस -

संघाच्या कामगिरीबाबत रोहित म्हणाला की, आम्हाला सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी करायची आहे. गेल्या आठ-नऊ सामन्यांपासून फलंदाजी चांगली झाली आहे. पण आम्हाला अधिक आक्रमक खेळायचे आहे. गोलंदाजीबाबत तो म्हणाला, गोलंदाजी हा मुख्य फोकस ( Bowling is the main focus ) आहे. क्षेत्ररक्षणात सुधारणा सातत्याने होत राहते आणि आम्ही ते करत राहू. तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 69 धावा करत भारताला विजयाकडे नेले, तर विराट कोहलीने अर्धशतक झळकावले.

रोहित म्हणाला, सूर्याविषयी आपल्या सर्वांना माहीत आहे की तो मैदानात सर्वत्र शॉट्स खेळू शकतो आणि हीच त्याची खासियत आहे. तो सातत्याने चमकत आहे. या सामन्यातील त्याची खेळी विशेष होती. कारण पॉवरप्लेमध्ये आम्ही दोन विकेट गमावल्या होत्या. त्याने दुसऱ्या टोकाला विराटसोबत अतिशय उपयुक्त भागीदारी केली.

हेही वाचा - IND vs AUS 3rd T20 : रोमहर्षक विजयानंतर कोहली-रोहितने 'अशा' प्रकारे साजरा केला आनंद, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.