ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : भारताचा पाकिस्तानवर सात गडी राखून विजय

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 1:22 PM IST

Updated : Oct 14, 2023, 8:07 PM IST

ICC Cwc 2023 India vs Pakistan
संपादित चित्र

20:06 October 14

भारताचा पाकिस्तानवर सात गडी राखून विजय

भारताचा पाकिस्तानवर सात गडी राखून विजय

19:31 October 14

रोहित शर्मा ६३ चेंडूत ८६ धावा करून बाद, शाहिन आफ्रिदीनं घेतली विकेट

पाकिस्ताननं दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या २२ षटकांत १५७-३ धावा झाल्या आहेत. सध्या केएल राहुल (२ चेंडूत १ धावा) आणि श्रेयस अय्यर (३८ चेंडूत ३६ धावा) क्रिजवर आहेत.

19:22 October 14

रोहित शर्मा-श्रेयस अय्यरची अर्धशतकीय भागिदारी, टीम इंडिया विजयाच्या समीप

पाकिस्ताननं दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या २० षटकांत १४२-२ धावा झाल्या आहेत. सध्या कर्णधार रोहित शर्मा (५७ चेंडूत ८० धावा) आणि श्रेयस अय्यर (३४ चेंडूत २८ धावा) क्रिजवर आहेत.

19:05 October 14

कर्णधार रोहित शर्मानं ठोकलं शानदार अर्धशतक

पाकिस्ताननं दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या १५ षटकांत १११-२ धावा झाल्या आहेत. सध्या कर्णधार रोहित शर्मा (४२ चेंडूत ६१ धावा) आणि श्रेयस अय्यर (१९ चेंडूत १६ धावा) क्रिजवर आहेत.

18:44 October 14

हसन अलीनं विराट कोहलीला १६ धावांवर बाद केलं, मोहम्मद नवाजनं त्याचा झेल घेतला

पाकिस्ताननं दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या ११ षटकांत ८१-२ धावा झाल्या आहेत. सध्या कर्णधार रोहित शर्मा (३१ चेंडूत ४६ धावा) आणि श्रेयस अय्यर (६ चेंडूत १ धावा) क्रिजवर आहेत.

18:34 October 14

९ ओव्हरनंतर भारताचा स्कोर (७७/१)

पाकिस्ताननं दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या ९ षटकांत ७७-१ धावा झाल्या आहेत. सध्या कर्णधार रोहित शर्मा (२९ चेंडूत ४४ धावा) आणि विराट कोहली (१४ चेंडूत १५ धावा) क्रिजवर आहेत.

18:22 October 14

पाच ओव्हरनंतर भारताचा स्कोर 39-1

पाच ओव्हरनंतर भारताचा स्कोर 39-1 झालाय. भारताची सुरुवातही खराब झाली असून, सुरुवातीलाच एक विकेट पडली होती.

18:03 October 14

शुभमन गिल १६ धावा करून बाद, शाहिन आफ्रिदीनं घेतली विकेट

पाकिस्ताननं दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या ३ षटकांत २३-१ धावा झाल्या आहेत. सलामीवीर शुभमन गिल ११ चेंडूत १६ धावा करून परतला. शाहिन आफ्रिदीनं त्याची विकेट घेतली. सध्या कर्णधार रोहित शर्मा (६ चेंडूत ६ धावा) आणि विराट कोहली (१ चेंडूत ० धावा) क्रिजवर आहेत.

17:26 October 14

पाकिस्तानविरुद्ध भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचं लक्ष्य

भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं ४२.५ षटकांत सर्वबाद १९१ धावा केल्या आहेत. आता भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचं लक्ष्य आहे. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमनं ५८ चेंडूत सर्वाधिक ५० धावा केल्या. तर मोहम्मद रिझवाननं ६९ चेंडूत ४९ धावा केल्या. भारताकडून बुमराह, सिराज, हार्दिक, कुलदीप आणि जडेजानं प्रत्येकी २-२ बळी घेतले.

17:23 October 14

पाकिस्तानच्या सर्वबाद १९१ धावा, भारतासमोर १९२ धावांचं लक्ष

भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं ४२.५ षटकांत सर्वबाद १९१ धावा केल्या.

17:11 October 14

हार्दिक पांड्यानं मोहम्मद नवाजला ४ धावांवर बाद केलं, बुमराहनं त्याचा कॅच घेतला

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या ४० षटकांत १८७-८ धावा झाल्या आहेत. सध्या हसन अली (१८ चेंडूत १२ धावा) आणि हसन अली (० चेंडूत ० धावा) क्रिजवर आहेत. हार्दिक पांड्यानं मोहम्मद नवाजला ४ धावांवर बाद केलं. बुमराहनं त्याचा कॅच घेतला.

16:50 October 14

बुमराहनं शादाब खानला २ धावांवर बोल्ड केलं

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या ३६ षटकांत १७२-७ धावा झाल्या आहेत. सध्या हसन अली (४ चेंडूत १ धावा) आणि मोहम्मद नवाज (४ चेंडूत २ धावा) क्रिजवर आहेत.

16:43 October 14

मोहम्मद रिझवान ६९ चेंडूत ४९ धावा करून बाद, बुमराहनं बोल्ड केलं

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या ३५ षटकांत १७०-६ धावा झाल्या आहेत. सध्या शादाब खान (४ चेंडूत २ धावा) आणि मोहम्मद नवाज (३ चेंडूत १ धाव) क्रिजवर आहेत.

16:34 October 14

कुलदीप यादवनं सौद शकीलला ६ धावांवर पायचित केलं, इफ्तिखार अहमदला ४ धावांवर बोल्ड केलं

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या ३३ षटकांत १६६-५ धावा झाल्या आहेत. सध्या मोहम्मद रिझवान (६४ चेंडूत ४८ धावा) क्रिजवर आहे.

16:29 October 14

सिराजनं घेतली धोकादायक बाबर आझमची विकेट, ५८ चेंडूत ५० धावा करून बाद

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या ३२ षटकांत १६२-३ धावा झाल्या आहेत. सध्या सौद शकील (८ चेंडूत ६ धावा) आणि मोहम्मद रिझवान (६४ चेंडूत ४८ धावा) क्रिजवर आहेत.

16:10 October 14

२९ षटकानंतर पाकिस्तानचा स्कोर (१५०/२), बाबर आझमचं अर्धशतक

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या २९ षटकांत १५०-२ धावा झाल्या आहेत. सध्या कर्णधार बाबर आझम (५७ चेंडूत ५० धावा) आणि मोहम्मद रिझवान (५५ चेंडूत ४३ धावा) क्रिजवर आहेत.

15:56 October 14

२५ षटकानंतर पाकिस्तानचा स्कोर (१२५/२)

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या २५ षटकांत १२५-२ धावा झाल्या आहेत. सध्या कर्णधार बाबर आझम (४७ चेंडूत ३५ धावा) आणि मोहम्मद रिझवान (४१ चेंडूत ३३ धावा) क्रिजवर आहेत.

15:38 October 14

२० षटकानंतर पाकिस्तानचा स्कोर (१०३/२)

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या २० षटकांत १०३-२ धावा झाल्या आहेत. सध्या कर्णधार बाबर आझम (३३ चेंडूत ३० धावा) आणि मोहम्मद रिझवान (२५ चेंडूत १६ धावा) क्रिजवर आहेत.

15:20 October 14

पाकिस्तानचे २ गडी बाद, बाबर आझम-मोहम्मद रिझवान क्रिजवर

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या १५ षटकांत ७९-२ धावा झाल्या आहेत. सध्या कर्णधार बाबर आझम (१४ चेंडूत १६ धावा) आणि मोहम्मद रिझवान (१४ चेंडूत ६ धावा) क्रिजवर आहेत.

15:06 October 14

पाकिस्तानला बसला दुसरा झटका, हार्दिक पांड्यानं घेतली इमाम उल हकची विकेट

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या १२.३ षटकांत ७३-२ धावा झाल्या आहेत. सध्या कर्णधार बाबर आझम (१३ चेंडूत १६ धावा) आणि मोहम्मद रिझवान (० चेंडूत ० धावा) क्रिजवर आहेत.

14:50 October 14

मोहम्मद सिराजनं अब्दुल्ला शफीकला २० धावांवर पायचित केलं

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या १० षटकांत ४९-१ धावा झाल्या आहेत. सध्या कर्णधार बाबर आझम (७ चेंडूत ५ धावा) आणि इमाम उल हक (२९ चेंडूत २३ धावा) क्रिजवर आहेत.

14:34 October 14

Cricket World Cup 2023 : पाकिस्तानला बसला पहिला झटका, अब्दुल्ला शफीक २० धावा करून बाद; स्कोर - ८ षटकांत (४१/१)

मोहम्म सिराजनं पाकिस्तानला पहिला झटका दिला. त्यानं अब्दुल्ला शफीकला २० धावांवर पायचित केलं. सध्या इमाम उल हक (२४ चेंडूत २० धावा) क्रिजवर आहे.

14:22 October 14

Cricket World Cup 2023 : पाकिस्तानची सावध सुरुवात; 6 षटकांत बिनबाद 28 धावा

भारतानं फलंदाजीच आमंत्रण दिल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली. दोन्ही सलामीवीर मैदानात असून पाकिस्तानच्या ६ षटकांत २८ धावा झाल्या आहेत.

13:36 October 14

भारताकडून पाकिस्तानला फलंदाजीच आमंत्रण; काय आहे दोन्ही संघांची प्लेयींग इलेव्हन

भारतानं नाणेफेक जिंकत पाकिस्तानला फलंदाजीच आमंत्रण दिलंय. भारताकडून सलामीविर शुभमन गिलचं पुनरागमन झालंय. तर ईशान किशनला संघातून डच्चू मिळालाय.

भारताची प्लेईंग ११ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर

पाकिस्तानची प्लेईंग ११ : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ

13:30 October 14

भारतानं नाणेफेक जिंकली

विश्वचषकाच्या सर्वात मोठा सामन्यात नाणेफेक भारतानं नाणेफेक जिंकली आहे. भारतानं गोलंदाजी स्वीकारली आहे. पाकिस्तान प्रथम फलंदाजीसाठी उतरेल.

13:23 October 14

दोन्ही संघ मैदानावर दाखल

या सामन्यासाठी दोन्ही संघ थोड्याच वेळापूर्वी मैदानावर दाखल झाले आहेत. नेमके कोणते खेळाडू फलंदाजी करतील ते थोड्याच वेळात समजेल.

11:05 October 14

ICC Cwc 2023 India vs Pakistan : भारताकडून पाकिस्तानला फलंदाजीच आमंत्रण; काय आहे दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

ICC Cwc 2023 India vs Pakistan : विश्वचषक 2023 चा 12वा सामना आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. विश्वचषकाचा सर्वात मोठा सामना भारतातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एका लाखांहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी या शानदार सामन्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. दोन्ही सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ आत्मविश्वासानं भरलेला असतानाच, पाकिस्ताननंही गेल्या सामन्यात विश्वचषकाचं मोठं लक्ष्य यशस्वीपणे गाठलं होतं.

Last Updated :Oct 14, 2023, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.