ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : विश्वचषकातून बाहेर पडलेल्या ६ संघांची कामगिरी कशी राहिली, जाणून घ्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 4:00 PM IST

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

Cricket World Cup 2023 : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोणते ४ संघ खेळतील हे आता स्पष्ट झालं आहे. तर इतर ६ संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. चला तर मग या संघांच्या आतापर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकूया.

नवी दिल्ली Cricket World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाचे साखळी सामने जवळपास संपले आहेत. भारत आणि नेदरलँड यांच्यात आज अखेरचा साखळी सामना खेळला जातोय. उपांत्य फेरीत ४ संघांनी आपलं स्थान पक्कं केलं, तर उरलेले ६ संघ शर्यतीतून बाहेर पडले. या सहा संघाची विश्वचषकात कशी कामगिरी राहिली, याबाबतची माहिती जाणून घेऊ या लेखातून.

या ४ संघांनी उपांत्य फेरीत केला प्रवेश : भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. उपांत्य फेरी गाठणारा दक्षिण आफ्रिका हा दुसरा संघ ठरला. गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा संघ ठरला. ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरी गाठणारा चौथा आणि शेवटचा संघ न्यूझीलंड आहे. ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिले.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

कोणते संघ बाहेर पडले आणि त्यांची कामगिरी कशी होती? :

पाकिस्तान - विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पाकिस्तान हा शेवटचा संघ ठरला. अखेरच्या साखळी सामन्यात ते इंग्लंडकडून पराभूत होताच त्यांचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तान ८ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर राहिला.

मॅचविजयपराभवगुणतालिकेत स्थान

अफगाणिस्तान - अफगाणिस्तान संघानं या विश्वचषकात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. त्यांच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा शेवटपर्यंत कायम होत्या. अफगाणिस्तानची मोहीम ८ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर संपली.

मॅचविजयपराभवगुणतालिकेत स्थान

इंग्लंड - इंग्लंडच्या संघानं या स्पर्धेत आपल्या कामगिरीनं सर्वांनाच निराश केलं. त्यांची स्पर्धेची सुरुवात अत्यंत वाईट झाली. गतविजेत्यांवर विश्वचषकाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की आली. मात्र त्यांनी शेवटचे दोन सामने जिंकून विश्वचषकाचा शेवट गोड केला. इंग्लंडनं तीन सामने जिंकून ६ गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आपली मोहीम संपवली.

मॅचविजयपराभवगुणतालिकेत स्थान

बांगलादेशच्या संघाला संपूर्ण स्पर्धेत केवळ २ सामने जिंकता आले. त्यांनी ४ गुणांसह गुणतालिकेत ८ व्या क्रमांकावर आपली मोहीम पूर्ण केली.

मॅचविजयपराभवगुणतालिकेत स्थान

श्रीलंका - यावर्षी भारतीय उपखंडात विश्वचषक होत असल्यानं श्रीलंकेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र श्रीलंकेचं विश्वचषकातील प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिलं. श्रीलंकेला केवळ २ सामन्यात विजय मिळवता आला. ते ४ गुणांसह गुणतालिकेत ९ व्या क्रमांकावर राहिले.

मॅचविजयपराभवगुणतालिकेत स्थान

नेदरलँड - गुणतालिकेत नेदरलँडचा संघ तळाच्या क्रमांकावर राहिला. त्यांनी विश्वचषकात आतापर्यंत २ सामने जिंकले आहेत. त्यांचा भारतासोबत अजून एक सामना बाकी आहे. पॉइंट टेबलमध्ये नेदरलँड ४ गुणांसह १० व्या क्रमांकावर आहे.

मॅचविजयपराभवगुणतालिकेत स्थान
१०

हेही वाचा :

  1. Farokh Engineer : 'ही टीम चॅम्पियन आहे, विश्वचषकात अपयशी होणार नाही', दिग्गज क्रिकेटर फारूख इंजिनियर यांच्याशी ETV Bharat ची खास बातचीत
  2. Sri Lanka Cricket : आयसीसीची मोठी कारवाई, श्रीलंका क्रिकेट बोर्ड निलंबित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.