ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : अनिल कुंबळे आणि मॅथ्यू हेडनच्या सर्वोत्तम विश्वचषक संघात किती भारतीय?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 6:12 PM IST

Cricket World Cup 2023 : १२ वर्षांनंतर भारतात आयोजित करण्यात आलेला विश्वचषक आता समाप्तीकडे वळलाय. भारत, द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, बांग्लादेश, श्रीलंका आणि नेदरलॅंड यांचं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आलं. उपांत्य फेरीच्या सामन्यांपूर्वी माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि मॅथ्यू हेडन यांनी विश्वचषकातील त्यांचा सर्वोत्तम संघ निवडला आहे. वाचा ही बातमी...

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

हैदराबाद : भारतात सुरू असलेला क्रिकेट विश्वचषक आता अंतिम टप्पात आला आहे. लीग टप्प्यातील सर्व ४५ सामने रविवारी संपले. आता लवकरच क्रिकेट विश्वाला नवा चॅम्पियन मिळेल.

विश्वचषक खास राहिला : हा विश्वचषक सर्व अर्थानं खूप खास ठरला. विश्वचषकात अनेक नवे विक्रम रचले गेले, तर अनेक मोठे विक्रम मोडले गेले. इतिहासात प्रथमच वेस्ट इंडिजची टीम विश्वचषकासाठी पात्र ठरली नाही. गतविजेत्या इंग्लंडची कामगिरी या विश्वचषकात अत्यंत खराब राहिली. तर नवख्या अफगाणिस्ताननं आपल्या कामगिरीनं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. रचिन रवींद्रसारख्या युवा खेळाडूंनी विश्वचषकात अनेकांची मनं जिंकली आहेत. तर दुसरीकडे, जोस बटलर सारखे काही बडे खेळाडू मात्र सपशेल अपयशी ठरले.

  • Anil Kumble & Matthew Hayden picked the World Cup team of the tournament on Espn Cricinfo:

    Rohit Sharma, De Kock, Virat Kohli, Rachin Ravindra, Glenn Maxwell, Heinrich Klaasen, Jadeja, Marco Jansen, Shami, Jasprit Bumrah, Zampa. pic.twitter.com/fo2tBhGDJc

    — Johns. (@CricCrazyJohns) November 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

साखळी सामन्यात भारताचा दबदबा : विश्वचषकाच्या साखळी सामन्यात भारताचा दबदबा राहिला. भारतानं आपले सर्व ९ सामने जिंकून बाद फेरीत धडाक्यात प्रवेश केला. साखळी सामने आटोपल्यानंतर आता भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू हेडन यांनी या विश्वचषकातील त्यांचा सर्वोत्तम प्लेइंग ११ संघ निवडला आहे. या प्लेइंग ११ मध्ये ५ भारतीय खेळाडूंना स्थान मिळालं. याशिवाय ३ खेळाडू दक्षिण आफ्रिकेचे, २ खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आणि १ खेळाडू न्यूझीलंडचा आहे.

  • Matthew Hayden and Anil Kumble picks Team of the Tournament in this World Cup 2023: (ESPNcricinfo)

    1. Rohit Sharma.
    2. De Kock.
    3. Virat Kohli.
    4. Rachin Ravindra
    5. Glenn Maxwell
    6. Heinrich Klaasen
    7. Ravi Jadeja.
    8. Marco Jansen.
    9. M Shami
    10. Jasprit Bumrah.
    11. Adam Zampa. pic.twitter.com/oWoFdSLBpw

    — CricketMAN2 (@ImTanujSingh) November 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अनिल कुंबळे आणि मॅथ्यू हेडनची विश्वचषकातील सर्वोत्तम प्लेइंग ११

  • रोहित शर्मा (भारत), क्विंटन डी कॉक (द. आफ्रिका), विराट कोहली (भारत), रचिन रवींद्र (न्यूझीलंड), ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), हेनरिक क्लासेन (द. आफ्रिका), रवींद्र जडेजा (भारत), मार्को यान्सन (द. आफ्रिका), मोहम्मद शमी (भारत), जसप्रीत बुमराह (भारत), अ‍ॅडम झम्पा (ऑस्ट्रेलिया)

हेही वाचा :

  1. Virender Sehwag : वीरेंद्र सेहवागला आयसीसीकडून मोठा सन्मान, 'ही' उपलब्धी मिळवणारा केवळ नववा भारतीय!
  2. Cricket World Cup 2023 : विश्वचषकात कोहलीच नंबर १! बनला सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
  3. Cricket World Cup 2023 : विश्वचषकातून बाहेर पडलेल्या ६ संघांची कामगिरी कशी राहिली, जाणून घ्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.