ETV Bharat / sports

IND v SL 2nd Test : विराट कोहली सोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते लाइव्ह मॅचदरम्यान उतरले मैदानात

author img

By

Published : Mar 14, 2022, 3:23 PM IST

Virat Kohli
Virat Kohli

भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टेडियममध्ये एक खळबळ उडाली होती. संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. डे-नाईट मॅचदरम्यान प्रेक्षकांची क्रेझ इतकी वाढली की, लाइव्ह मॅचदरम्यान काही प्रेक्षक मैदानात उतरले होते.त्यापैकी एकाला विराट कोहली सोबत सेल्फी घेण्यात यश मिळाले

बंगळुरु : भारत विरुद्ध श्रीलंका संघात दिवस-रात्र कसोटी ( India v Sri Lanka Day-Night Test ) सामना खेळला जात आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या क्षणांमध्ये तीन चाहते सुरक्षेचा भंग करत मैदानात घुसले. त्यापैकी एकाने विराट कोहलीसोबत सेल्फी ( Selfie with Virat Kohli ) काढण्यात यश मिळवले, त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्यांना बाहेर काढले.

ही घटना श्रीलंकेचा दुसरा डाव सुरु असताना आठव्या षटकात घडली. तेव्हा मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता ( Mohammed Shami was bowling ). त्यावेळी मोहम्मद शमीचा चेंडू लागल्याने कुसाल मेंडिस उपचार घेत होता. तेव्हा स्टार खेळाडू विराट कोहलीला जवळून पाहण्यासाठी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तीन प्रेक्षक मैदानात घुसले.

मैदानात घुसलेल्यापैकी एक प्रेक्षक विराट कोहलीच्या जवळ पोहचण्यात यशस्वी झाला. तेव्हा विराट कोहली स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. जवळ पोहचलेल्या चाहत्याने आणि विराट कोहलीला सेल्फी घेण्यास विनंती केली. त्यानंतर विराट कोहली सेल्फी घेण्यासाठी तयार ( Virat Kohli ready to take selfie ) झाला, तेव्हा या चाहत्याचा आनंद गगनात मावेना. सेल्फी घेतल्यानंतर सुरक्षारक्षकाने त्या चाहत्याला मैदानातून बाहेर काढले.

  • Lucky Fans selfie with Virat Kohli.

    Virat Kohli is standing there with a great pose towards camera and also Kohli asked security to not to do anything against those fans. ❤ pic.twitter.com/upy28NIUAB

    — Diwakar¹⁸ (@diwakarkumar47) March 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने पहिल्या डावात ( India first innings ) 252 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ 109 धावा करू शकला होता. यानंतर टीम इंडियाने 9 विकेट्सवर 303 धावा करून दुसरा डाव घोषित केला. दुसऱ्या डावात ऋषभ पंतने 50 आणि श्रेयस अय्यरने 67 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने दुसऱ्या डावात एक विकेट गमावून 28 धावा केल्या होत्या. तसेच संघाला विजयासाठी अजून 419 धावांची गरज होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.